Parliament Attack : संसदेत घुसखोरी करण्यापुर्वी सागर शर्माचे आईसोबत शेवटचे संभाषण, म्हणाला ‘काहीतरी मोठं…’

प्रशांत गोमाणे

14 Dec 2023 (अपडेटेड: 14 Dec 2023, 08:01 AM)

संसदेत घुसखोरी करणाऱ्या सागर शर्मा याच्या घरी लखनऊ पोलीस दाखल झाली होती. यावेळी पोलिसांनी केलेल्या तपासात सागर शर्माबाबत अनेक गोष्टींचा उलगडा झाला.

parliament security breach who is sagar sharma lucknow anti government post comment on religion

parliament security breach who is sagar sharma lucknow anti government post comment on religion

follow google news

Parliament Security Breach,Sagar Sharma : संसदेत बुधवारी चार तरूणांनी घुसखोरी करून अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या होत्या. या घटनेनंतर लोकसभेच्या सभागृहातून सागर शर्मा (Sagar Sharma) आणि मनोरंजन डी यांना अटक केली होती. तर संसद परिसरातून नीलम (42) आणि अमोल शिंदे (25) यांना अटक झाली होती. या चारही आरोपींवर आता यूएपीएच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींमधील सागर शर्मा या तरूणांबाबत अनेक खळबळजनक माहिती समोर आली आहे. (parliament security breach who is sagar sharma lucknow anti government post comment on religion)

हे वाचलं का?

संसदेत घुसखोरी करणाऱ्या सागर शर्मा याच्या घरी लखनऊ पोलीस दाखल झाली होती. यावेळी पोलिसांनी केलेल्या तपासात सागर शर्माबाबत अनेक गोष्टींचा उलगडा झाला. यावेळी दिल्लीला पोहोचण्यापुर्वी सागर शर्माने ‘मी दिल्लीला जातोय, काहीतरी मोठं घडवून आणणार आहे’, असे आईला सांगून तो घराबाहेर पडला होता. तसेच सागरचं सोशल मीडिया अकाऊंट तपासलं असता, तो सरकारविरोधात अनेक पोस्ट करायचा. सागर शर्मा स्टेटसवर इतिहास लिहिण्याची भाषा देखील करायचा.

हे ही वाचा : अमोल शिंदेच्या मदतीला महाराष्ट्राच्या ‘या’ वकिलाची धाव, कायदेशीर लढा देणार!

या प्रकरणात पोलिसांनी सांगितले की, सागर शर्मा सोशल मीडियावर खुप अॅक्टीव्ह असायचा. तसेच केंद्र सरकारविरोधात नेहमी पोस्ट करायचा. इतकंच नाही तर त्याच्या सोशल मीडियावर स्टेटवर तो इतिहास लिहिण्याची भाषा करायचा. दिल्लीत पोहोचण्याआधी सागर शर्मा काहितरी मोठं घडवून आणणार आहे’, असे आईला सांगून घराबाहेर पडला होता.

सागर भगतसिंगला आपला आदर्श मानतो. दुसरीकडे तो हिंदू धर्मावरही टीका करत असतो. त्याचं सोशल मीडिया अकाऊंट अशाच पोस्ट्सने भरलेलं आहे. सागर शर्मा हा लखनऊमधील मानक नगर पोलीस स्टेशन हद्दीतील रामनगर भागातील रहिवासी आहे. तो ई-रिक्षा चालवायचा.

हे ही वाचा : भावाच्या प्रेयसीला दहाव्या मजल्यावरून दिले ढकलून, सगळी घटना सीसीटीव्हीत कैद

सागरच्या कुटुबियांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी ‘दिल्लीतील एका विरोध प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी त्याने घर सोडले होते, परंतु संसदेतील घटनेत सहभागी होण्याच्या त्याच्या हेतूबद्दल आम्हाला काहीही माहिती नव्हतं.

‘सागर शर्मा (28) हा त्याच्या बहीण आणि आई-वडिलांसोबत रामनगर भागात भाड्याच्या घरात राहतो. त्याचे वडील रोशन लाल हे सुताराचे काम करतात आणि सागर स्वतः ई-रिक्षा चालवतात. हे कुटुंब एका दशकाहून अधिक काळ भाड्याच्या घरात राहत आहे, असे माणक नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी शिव मंगल सिंह यांनी सांगितले आहे.

    follow whatsapp