Sambhaji Bhide : भिडेंच्या विधानावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भाजपशी संबंध…”

योगेश पांडे

• 08:25 AM • 30 Jul 2023

काँग्रेसकडून संभाजी भिडेंना अटक करण्याची मागणी केली आहे. आता यावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

Devendra fadnavis hits out at sambhaji bhide over controversial statement on mahatma gandhi.

Devendra fadnavis hits out at sambhaji bhide over controversial statement on mahatma gandhi.

follow google news

Sambhaji Bhide Mahatma Gandhi : संभाजी भिडेंनी महात्मा गांधींबद्दल बोलताना गरळ ओकली. महात्मा गांधी यांचे वडील मुस्लिम जमीनदार होते, असं भिडे म्हणाले. त्यांच्या या विधानाचे संतप्त पडसाद उमटले. काँग्रेसकडून संभाजी भिडेंना अटक करण्याची मागणी केली आहे. आता यावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. (Devendra Fadnavis First Reaction on Sambhaji Bhide controversy)

हे वाचलं का?

नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानावर भूमिका मांडली. फडणवीस म्हणाले, “संभाजी भिडे गुरुजींनी जे वक्तव्य केले आहे, त्याचा मी पूर्णपणे निषेध करतो. महात्मा गांधी या देशाचे राष्ट्रपिता आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये एक महानायक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि अशा महानायक बद्दल अशा प्रकारचं व्यक्तव्य करणं हे पूर्णपणे अनुचित आहे.”

‘महात्मा गांधींबद्दल अशी विधान सहन केली जाणार नाही’

“माझं स्पष्ट मत आहे की, अशा प्रकारचे वक्तव्य भिडे गुरुजींनी करू नये आणि कोणीच करू नये. करोडो करोडो लोकांचा अशा वक्तव्यामुळे निश्चितपणे त्या ठिकाणी संताप तयार होतो. लोक महात्मा गांधींबद्दल असं बोललेलं कधीच सहन करणार नाही”, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

वाचा >> Sambhaji Bhide : “महात्मा गांधींचे वडील मुस्लीम जमीनदार”, भिडेंनी तोडले तारे

संभाजी भिडेंवर कारवाई होणार

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, “या संदर्भात जी उचित कारवाई करायची आहे, ती राज्य सरकार करेल. महात्मा गांधी असो, स्वातंत्र्यवीर सावरकर असो… कुणाच्याही विरुद्ध बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही”, अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली.

वाचा >> Sambhaji Bhide: ‘गांधींविरुद्ध बोलण्याची औकात आहे का भिडेची?’, माजी मंत्री प्रचंड संतापले

“संभाजी भिडे गुरुजींचा भाजपशी काही संबंध नाही. ते त्यांचे स्वतःची संघटना चालवतात, याला जाणीवपूर्व राजकीय रंग देण्याचे काही कारण नाही याचा निषेध करत काँग्रेसचे लोक रस्त्यावर उतरतात तसंच स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अतिशय गलिच्छ ज्यावेळेस राहुल गांधी बोलतात त्यावेळी त्यांनी त्याचा निषेध केला पाहिजे पण ते करत नाही. कुठल्याही परिस्थितीत महात्मा गांधींचा अपमान सहन केला जाणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस या प्रकरणावर बोलताना म्हणाले.

    follow whatsapp