शिवसेना आमदार भरतशेट गोगावलेंच्या भाऊ, पुतण्याकडून उपसरपंचाला बेदम मारहाण

मुंबई तक

• 08:30 AM • 01 May 2023

महाडमधील शिवसेनेचे आमदार भरतशेट गोगावलेंच्या भाऊ आणि पुतण्याने एका उपसरपंचाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी आता महाड पोलिसात गुन्हाही दाखल झाला आहे.

shiv sena mla bharatshet gogawales brother and nephew brutally beat up deputy sarpanch

shiv sena mla bharatshet gogawales brother and nephew brutally beat up deputy sarpanch

follow google news

महाड: शिवसेना (Shiv Sena) आमदार भरतशेट गोगावले (Bharatshet Gogawale) यांच्या भावाने आणि पुतण्याने महाड (Mahad) तालुक्यातील पिंपवाडी गावातील उपसरपंचावर जीवघेणा हल्ला केल्याची तक्रार महाड पोलिसात दाखल झाली आहे. यावेळी मारहाण करणाऱ्यांपासून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोपही उपसरपंच आणि त्यांच्या कुटुंबीयांनी यावेळी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल (30 एप्रिल) संध्याकाळच्या सुमारास महाड तालुक्यातील पिंपळवाडी येथे जबर हाणामारी झाली. ज्यामध्ये विद्यमान उपसरपंच कल्पेश पांगारे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील काही लोकांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. (shiv sena mla bharatshet gogawales brother and nephew brutally beat up deputy sarpanch)

हे वाचलं का?

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळवाडीचे उपसरपंच कल्पेश पांगारे यांनी काही मुद्द्यांवरुन ग्रामपंचायतीतील कारभाराबाबत सवाल उपस्थित केले होते. याच मुद्द्यावरु आमदारा भरत गोगावले यांचे भाऊ महेश गोगावले आणि पुतण्या चंद्रकांत गोगावले यांनी याच मुद्द्यावरून उपसरपंच कल्पेश पांगारे आणि त्यांच्या वडिलांना भररस्त्यात मारहाण केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. या मारहाणीत उपसरपंच कल्पेश पांगारे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हे ही वाचा>> पुणे हादरलं! लंडनमध्ये नोकरीला जाण्याआधीच वहिनीचा खून, पळून जाणारा दीरही ठार

या घटनेबाबत माहिती देताना कल्पेश पांगारे यांच्या वडिलांनी अशी माहिती दिली की, ‘काल गावात जत्रेचा कार्यक्रम होता.. जत्रा संपवून लोकं घरी चालली होती. त्यावेळी मी दुधाणेवाडीच्या बस स्टॉपला मी गेलो. त्यावेळी महेश गोगावले याने मला रस्त्यात अडवलं आणि धमकी देत म्हणाला की, तुमच्या मुलाला समजवा नाही तर मी त्याला रस्त्यात तुडवेन. तेव्हा मी त्याला म्हटलं की, रस्त्यात तुडवण्यापेक्षा आता तुडव.. त्यावेळी मला चंद्रकांत गोगावलेने पकडला आणि मला रस्त्यात खाली पाडून मला मारलं. त्यानंतर त्यांनी मला बेदम मारहाण केली. ज्यामध्ये माझ्या डोक्याला दुखापत झाली.’

‘मला मारल्यानंतर त्यांनी माझा मुलगा कल्पेश पांगारे याला देखील बेदम मारहाण केली. ज्यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली आहे. महेश गोगावले आणि चंद्रकांत गोगावले यांची 10-15 लोकं होती. त्यांनी सगळ्यांनी मिळून आम्हाला मारहाण केली.’ असं बाबू पांगारे म्हणाले.

तर कल्पेश पांगारे यांनी देखील गोगावलेंवर गंभीर आरोप केले आहते. ‘सर्व आरोपींनी माझ्या आईला देखील मारहाण केली. तिचाही त्यांनी गळा दाबला. ते तिच्यावर देखील ते धावून गेले. त्यांनी आम्हाला जीवे मारण्याची देखील धमकी दिली आहे.’

हे ही वाचा>> हत्येच्या काही सेंकद आधी अतिक अहमदने कोणाला केला होता इशारा? Video व्हायरल

दरम्यान, या घटनेनंतर कल्पेश पांगारे यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी मारहाण झालेल्या पांगारे कुटुंबीयांना महाड ग्रामीण रुग्णालयात पाठवलं. यावेळी उपसरपंच आणि त्यांच्या वडिलांना जबर मारहाण केल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. याप्रकरणी रात्री पोलीस महाड पोलिसात आता तक्रार दाखल झाली आहे.

शिवसेना आमदार भरतशेट गोगावलेंची प्रतिक्रिया

या प्रकरणी मुंबई Tak ला प्रतिक्रिया देताना शिवसेना आमदार भरतशेट गोगावले म्हणाले की, ‘जो काही प्रकार झाला तो दुर्दैवी आहे. खरं तर शाब्दिक बाचाबाचीतून ही घटना घडली आहे. खरं तर असं व्हायला नको हवं होतं. पण झालेल्या प्रकाराबाबत मी स्वत: लक्ष घातलं असून ते प्रकरण गावाच्या पातळीवर मिटवलं जाईल. आमच्या गावांमध्ये असे प्रकार होत नाही. त्यामुळे हे प्रकरण गावातच मिटवले जाईल.’ असं आमदार भरतशेट गोगावले यावेळी म्हणाले.

    follow whatsapp