हे काय घडलं भलतंच? सासूच्या रचलेल्या चितेवर जाऊन बसली सून…

मुंबई तक

• 02:33 PM • 09 Jan 2024

जमिनीचे वाद कधी कुठे पोहचतील हे सांगता येणार नाही,कारण उत्तर प्रदेशातील एका स्मशानभूमीत सासूवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जमिनीच्या वाटणीसाठी सून थेट तिच्या चितेवरच जाऊन बसली. वाटणी केल्याशिवाय अंत्यसंस्कार करू देणार नाही असा पवित्रा घेतल्याने नंतर थेट पोलिसांनाच हस्तक्षेप करावा लागला.

Uttar Pradesh incident in where the daughter-in-law sat on the pyre made by the mother-in-law for land and wealth

Uttar Pradesh incident in where the daughter-in-law sat on the pyre made by the mother-in-law for land and wealth

follow google news

UP News: उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. जमीन आणि संपत्तीच्या (Land and property) वादासाठी एका सुनेने सासूच्या अंत्यसंस्कारावेळीच मोठा गोंधळ घातला. सासूवर अंत्यसंस्कार (funeral) करण्यासाठी जी चिता रचली होती, त्या चितेवरच मोठी सून जाऊन बसल्याने त्या घटनेची आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे. स्मशानभूमीतील या गोंधळामुळे कोणालाच काही समजले नाही. त्यामुळे या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर स्मशानभूमीत पोलिसांनी येत सुनेची समजूत काढून नंतर महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हे वाचलं का?

स्मशानभूमीतच गोंधळ

उत्तर प्रदेशातील एका गावामध्ये वृद्ध महिलेचा मृत्यू झाला मात्र त्या वृद्धेच्या मृत्यूनंतर तब्बल 3 तास ​तिच्या मृतदेहावर ​अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत. या घटनेची माहिती पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनीही घटनास्थळी दाखल होत चितेवर चढून गोंधळ घालणाऱ्या महिलेला खाली उतरून नंतर मृत महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हे ही वाचा >> शिवसेनेच्या आमदार अपात्रता निकालाआधी देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

थेट चितेवरच जाऊन बसली

कमलापूर पोलीस स्थानकाच्या लोधौरामध्ये राहणाऱ्या दिवंगत गजराज सिंह यांच्या पत्नीचे रविवारी रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. मायावती सिंह यांच्या मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मृतदेह गावी आणण्यात आला. मृत मायावती यांच्या लहान मुलाने आपली आईच्या मृत्यूनंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याची तो तयारी करू लागला. ज्यावेळी अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह चितेवर ठेवण्यात आला त्याचवेळी मृत मायावती यांचा मोठ्या मुलाची बायको अचानकपणे चितेवर चढून बसली. त्यानंतर तिथेच तिने जोरात गोंधळ घालायला सुरुवात केली.

पोलिसही चक्रावले

मोठ्या सुनेचा गोंधळ बघून गावातील नागरिकांना धक्काच बसला, तिच्या गोंधळामुळे सगळेच जण स्तब्ध झाले. हा गोंधळ वाढत गेल्याने नंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. स्मशानभूमीतील गोंधळानंतर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्मशानभूमीत येत त्या महिलेची समजूत काढून तिला चितेवर खाली उतरवण्यात आले. संपत्तीच्या आणि जमिनीच्या वादातून एका मुलाला त्यातून काहीच मिळाले नाही, त्यामुळेच मृत महिलेची मोठी सून नाराज होती. त्यामुळेच हा गोंधळ घातल्याचे नंतर समजले.

    follow whatsapp