IMD: ‘गरज असेल तरच घराबाहेर पडा’, हवामान खात्याने पावसाबाबत दिला मोठा इशारा

रोहित गोळे

26 Jul 2023 (अपडेटेड: 26 Jul 2023, 03:56 PM)

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसत असून हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच स्थानिक प्रशासनाने रेड अलर्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.

very heavy rain mumbai sangli kolhapur maharashtra meteorological department red alert declared holidays for schools and colleges news in marathi today

very heavy rain mumbai sangli kolhapur maharashtra meteorological department red alert declared holidays for schools and colleges news in marathi today

follow google news

Mumbai Rain: मुंबई: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने आता वायव्य दिशेला त्याची हालचाल होण्याची शक्यता असल्याने पुढील 5 दिवसांत महाराष्ट्रात (Maharashtra) पावसाचा (Heavy Rain) जोर वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज (26 जुलै) मुंबई (Mumbai) आणि परिसरात दुपारपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसाने अद्यापही उसंत घेतलेली नाही. त्यामुळे येथील धरणं तुडुंब भरले असून त्यापैकी अनेक धरणांचे दरवाजेही उघडले आहेत. त्यामुळे काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. (very heavy rain mumbai sangli kolhapur maharashtra meteorological department red alert declared holidays for schools and colleges news in marathi today)

हे वाचलं का?

मुंबईकरांनो सावधान

भारतीय हवामान खाते (मुंबई) यांच्या वतीने, मुंबई महानगराला आज (26 जुलै) रात्री 8 ते उद्या (27 जुलै) दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा देण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना उद्या गुरुवार दिनांक 27 जुलै 2023 रोजी सुटी जाहीर केली आहे.

तसेच, सर्व मुंबईकर नागरिकांना विनंती करण्यात येते की, कृपया सर्वांनी सतर्क रहावे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्‍या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी साचलं पाणी

संततधार पावसामुळे मुंबईतील बोरिवली पूर्व स्थानकासमोर पाणी साचले आहे. सततच्या पावसामुळे येथील पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे पाणी साचले आहे. यासोबतच बोरीवली पूर्व एसव्ही रोडवरही पाणी साचले आहे.

ठाण्यातील वंदना एसटी बस डेपोच्या बाहेर साचलं पाणी

ठाण्यातही गेल्या अनेक तासांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे वंदना एसटी बस डेपोच्या बाहेर पाणी साचलं आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी सक्षम पंपाच्या साह्याने पाणी काढले जात आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणारं तानसा धरण ओव्हरफ्लो, धरणाचे दरवाजे उघडले

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा धरण ओव्हरफ्लो झाल्याने पालघर जिल्ह्यातील शाहपूर, भिवंडी आणि वसई तालुक्यातील तानसा धरणाच्या खाली आणि नदीच्या आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणातून वाहणाऱ्या पाण्याबाबत ग्रामस्थांना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला.

सांगली: वारणा धरणाचे दोन दरवाजे उघडले , 2456 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाटयाने वाढ होत आहे. वारणा धरण 80% भरले आहे. जलाशय परिचलन सूचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणांतून चालू असलेल्या विसर्गात वाढ करुन वक्रद्वारमधून 1545 क्युसेस व विद्युत जनित्रमधून 911 क्यूसेस असे एकूण 2456 क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हे ही वाचा >> MNS Toll: ‘टोलचा सगळा पैसा घेणारा म्हैसकर कोणाचा लाडका…’, राज ठाकरे प्रचंड संतापले

सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीची पाणी पातळी 19 फुटांवर गेली असून कृष्णा नदीची इशारा पातळी 40 फूट तर धोक्याची पातळी 45 फूट इतकी आहे. तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. असे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांचे आवाहन केले आहे.

कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन, पोलीस खाते, पाटबंधारे विभाग सज्ज आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी संभाव्य पूरस्थिती व आपत्ती व्यवस्थापन संदर्भात प्रशासन सज्जतेबाबत माहिती दिली व नागरिकांना घाबरून जाऊ नये असे आवाहन केले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण 100 टक्के भरले, 5 दरवाजे उघडले

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. 26 जुलै 2023 रोजी सकाळी स्वयंचलित गेट क्रमांक उघडला. धरण क्रमांक 3, 4, 5 आणि 6, 7 चे स्वयंचलित दरवाजे सकाळपासून उघडण्यात आले असून एकूण 5 दरवाजे उघडण्यात आले आहेत. या पाच दरवाज्यातून तब्बल 8 हजार क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे.

कोल्हापुरातील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी देखील ओलांडली आहे. राधानगरी धरणातून पंचगंगा नदीत पाणी सोडण्यात आल्याने बदोत्रीला पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, नदीकाठच्या सर्व नागरिकांना प्रशासनासह स्थलांतराच्या तयारीत राहण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातही मुसळधार पाऊस

काल सायंकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असून हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. येणाऱ्या 24 तासांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पावसाचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये
यासाठी हे आदेश काढण्यात आले आहेत. रत्नागिरी शहर तसेच आजूबाजूचा गावामध्ये व काही ठराविक तालुक्यांमध्ये काल सायंकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे.

हे ही वाचा >> Pune Crime News : महिलेवर तिच्या पतीसमोरच बलात्कार! सावकाराचं भयंकर कृत्य

दुसरीकडे चिपळूणच्या वाशिष्ठ नदीच्या पाण्याची पातळीत घट झाली आहे. तर जगबुडी नदीने मात्र धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. येणाऱ्या 24 तासात नागरिकांनी खबरदारी घ्यावी व सर्व आपत्ती व्यवस्थापन यांनी अलर्ट मोडवर राहावे अशा प्रकारच्या स्थानिक प्रशासनाने सूचना दिल्या आहेत.

गोव्यात शुक्रवारपर्यंत रेड अलर्ट

गोव्यात शुक्रवारपर्यंत हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर करावी अशी मागणी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी विधानसभेत केली आहे. राज्यातील पावसाचा अंदाज घेऊन संध्याकाळपर्यंत योग्य तो निर्णय घेण्याच्या सूचना शिक्षण खात्याला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत सांगितलं.

    follow whatsapp