Vladimir Putin यांना हृदयविकाराचा झटका? नेमकं सत्य काय?

रोहिणी ठोंबरे

• 11:30 AM • 24 Oct 2023

आज (24 ऑक्टोबर) सकाळी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी पसरताच सोशल मीडियावर खळबळ उडाली.

Vladimir Putin heart attack Get Know the real truth

Vladimir Putin heart attack Get Know the real truth

follow google news

Vladimir Putin Suffers Heart Attack : आज (24 ऑक्टोबर) सकाळी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी पसरताच सोशल मीडियावर खळबळ उडाली. काही वेळातच ही बातमी सोशल मीडियावर ट्रेंड करायला लागली. स्काय न्यूज या वृत्त संस्थेने याबद्दल वृत्त दिले आहे की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना अचानक हृदयविकाराचा (Heart Attack) झटका आला. (Vladimir Putin heart attack Get Know the real truth)

हे वाचलं का?

क्रेमलिनच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, पुतिन यांच्या रक्षकांना ते खोलीत जमिनीवर पडलेले आढळले. टेलिग्राम चॅनेलवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की रक्षकांनी पुतीन यांना ताबडतोब उपचारासाठी डॉक्टरांकडे नेले, त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली.

वाचा: ‘गोपीनाथ मुंडे स्मारक आता बनवू नका’; पंकजा मुंडे भडकल्या, मेळाव्यातून भाजपवर तोफ

टेलिग्राम चॅनल जनरल SVR वरील या बातमीने सर्वत्र उडाली खळबळ!

टेलिग्राम चॅनेल जनरल एसव्हीआर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आरोग्यावर टिप्पणी करतात आणि त्यातच पुतीन सध्या गंभीर आजारी असल्याचा दावाही करण्यात आला होता.

जेव्हा अध्यक्षांच्या खोलीत काहीतरी पडल्याचा आवाज आला…

जनरल एसव्हीआरने दिलेल्या माहितीनुसार, मॉस्कोच्या वेळेनुसार रात्री 9 वाजण्याच्या सुमारास रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या घरी असलेल्या सुरक्षा अधिकाऱ्यांना राष्ट्राध्यक्षांच्या खोलीत काहीतरी पडल्याचा आवाज आला. अहवालात असेही म्हटले आहे की, दोन सुरक्षा अधिकाऱ्यांनी ताबडतोब राष्ट्राध्यक्षांच्या खोलीत डोकावले आणि त्यावेळी त्यांना पुतीन बेडजवळ जमिनीवर पडलेले दिसले.

वाचा: Nilesh Rane : राणेंच्या पुत्राचा ‘राजकीय संन्यास’; नीलेश राणेंनी का सोडलं राजकारण?

डॉक्टरांनी तातडीने उपचार केले सुरू

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्लादिमीर पुतिन जमिनीवर पडलेले होते, त्यांचे डोळे पांढरे झाले होते. अशा वेळी पुतिन यांच्या घरी त्या वेळी तैनात असलेल्या डॉक्टरांना तत्काळ माहिती देण्यात आली आणि त्यांच्यावर उपचार सुरू केले. या बातमीने सकाळी सोशल मीडियावर खळबळ उडाली असली तरी नंतर या बातमीशी संबंधित कोणतीही अपडेट समोर आली नाही. रशियाकडून या प्रकरणी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

वाचा: Hamoon cyclone : ‘तेज’ पाठोपाठ ‘हमून’ चक्रीवादळ झाले उग्र! महाराष्ट्राला किती धोका?

क्रेमलिनने या बातम्या फेटाळाल्या

यादरम्यान, क्रेमलिनकडून एक निवेदन जारी करण्यात आले असून, 71 वर्षीय राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आजारी असल्याच्या बातम्या फेटाळाल्या आहेत. क्रेमलिनच्या सूत्रांच्या हवाल्याने असा दावा करण्यात आला आहे की पुतिन यांच्या हृदयविकाराच्या झटक्याशी संबंधित जे काही बातम्या सोशल मीडियावर पसरल्या आहेत त्या केवळ अफवा आहेत. क्रेमलिनने म्हटले आहे की पुतिन पूर्णपणे निरोगी आहेत आणि घरी आहेत.

    follow whatsapp