पती तुरुंगात अन् पत्नीला हवंय मूल; हायकोर्टाने ‘डीन’ला काय दिले आदेश?

प्रशांत गोमाणे

• 07:16 AM • 02 Nov 2023

मध्य प्रदेश उच्च न्यायालयात महिलेने याचिका केली आहे. या याचिकेत महिलेने तिच्या पतीची तुरूंगातून सूटका करावी अशी न्यायालयाकडे मागणी केली आहे.

wife wants to be pregnant women petition in mp high court for husband bail madhya pradesh story

wife wants to be pregnant women petition in mp high court for husband bail madhya pradesh story

follow google news

Wife wants to be Pregnant Women petition in court : अपत्य प्राप्तीचा प्रत्येकालाच अधिकार असतो. याच अधिकारातून एका महिलेने आता अपत्य प्राप्तीसाठी येट न्यायालयात याचिका केली आहे. ”मला बाळ हवंय” असे याचिकेत म्हणत बायकोने तूरूंगात असलेल्या नवऱ्याची सुटका करावी अशी मागणी केली आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयात (Madhya Pradesh Court) महिलेने ही याचिका केली आहे. या याचिकेवर आता न्यायालयाने डॉक्टराची एक टीम गठीत केली आहे. ही टीम महिलेची तपासणी केल्यानंतर न्यायालयाला अहवाल देणार आहे. त्यानंतर न्यायालय यावर निकाल देऊ शकते. (wife wants to be pregnant women petition in mp high court for husband bail madhya pradesh story)

हे वाचलं का?

मध्य प्रदेश उच्च न्यायालयात महिलेने याचिका (Petition) केली आहे. या याचिकेत महिलेने तिच्या पतीची तुरूंगातून सूटका करावी अशी न्यायालयाकडे मागणी केली आहे. महिला तिच्या याचिकेत म्हणते की, मला मुल हवंय. अपत्य प्राप्ती आमचा मुलभूत अधिकार आहे. त्यामुळे माझ्या पतीची तुरूंगातून सूटका करावी, अशी मागणी महिलेने केली होती.

हे ही वाचा : Maratha Reservation : आरक्षण आंदोलनात भाजप फसलं? समजून घ्या राजकारण

याचिकाकर्त्याचा पती एका फौजदारी खटल्यात तुरुंगात आहे आणि महिलेला बाळ हवय. त्यासाठी तिने राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मूल होण्याचा तिचा मूलभूत अधिकार असल्याचा दावा केला आह,अशी माहिती सरकारी वकील सुबोध कथार यांनी दिली आहे.

कथार यांनी पुढे सांगितले, महिलेने तिच्या नवऱ्याची तूरूंगातून सूटका करण्याची मागणी केली आहे.कथार म्हणाले की, महिलेने तिच्या रेकॉर्डनूसार रजोनिवृत्तीचे वय ओलांडले आहे.त्यामुळे कृत्रिम किंवा नैसर्गिकरित्या तिची आई होण्याची शक्यता नाही.

न्यायालयाचा निकाल काय?

या याचिकेवर न्यायमूर्ती विवेक अग्रवाल यांच्या एकल खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. याचिकाकर्ता आई होण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या योग्य (मेडीकली फिट) आहे की नाही हे ठरवण्यासाठी तज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

हे ही वाचा : Mumbai Crime : मेहंदीवाले केस, कानातले…; महिलेची हत्या करणारा कसा सापडला?

तसेच याचिकाकर्त्या महिलेला 7 नोव्हेंबरला कॉलेजच्या डीनसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले. डॉक्टरांच्या टीममध्ये तीन स्त्रीरोगतज्ज्ञ, एक मानसोपचारतज्ज्ञ आणि एक एंडोक्राइनोलॉजिस्ट यांचा समावेश असेल. डीन या प्रकरणाचा अहवाल 15 दिवसात सादर करतील. न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 नोव्हेंबर रोजी ठेवली आहे.

दरम्यान या प्रकरणात आता महिलेला मुलं होण्यासाठी तिच्या पतीची तुरुंगातून सुटका होते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

    follow whatsapp