राज्यात मान्सून सक्रिय झाला असून काही भागांत पावसाने हजेरी लावली, मात्र अपेक्षित अशी मान्सूनची स्थिती दिसून येत नाही. अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित झालाय की, पावसाने ब्रेक घेतलाय का? हवामान विभागाच्या अंदाजानुसार काही दिवस राज्यात सर्वत्ररित्या एकसारखा पाऊस होणार नसल्याचा अंदाज वर्तवला.
ADVERTISEMENT
अशातच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावरील परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक ते मध्यम स्वरुपाचा मान्सून दाखल झाला आहे. हवामान तज्ञ्जांच्या माहितीनुसार, मान्सूनचा प्रवाह दिसून येत असला तरीही पावसाची काही अंशी प्रमाणात तीव्रता भासण्याची अधिक शक्यता आहे. जुलै महिन्यांत काही भागांत जोरदार पावसाची शक्यता वाढण्याची शक्यता आहे. पुणे, रत्नागिरी, नाशिक, संभाजीनगरसह अनेक ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे. काही ठिकाणी मान्सूनसह विजांच्या शक्यता असल्याने नागरिकांनी खबरदारी बाळगावी.
ADVERTISEMENT










