दुर्गंधी सुटल्याने बंद घराचा दरवाजा मालकाने तोडला, किचनखाली महिलेची बॉडी अन् 5 महिन्यांनी खुलासा

Crime News : एका प्लंबरने महिला मजुराची हत्या करून तिचा मृतदेह स्वयंपाकघराच्या फरशीखाली गाडून लपवल्याची धक्कादायक घटना पाच महिन्यांनंतर उघडकीस आली आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 07:55 AM • 06 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

दुर्गंधी सुटल्याने बंद घराचा दरवाजा मालकाने तोडला

point

किचनखाली महिलेची बॉडी अन् 5 महिन्यांनी खुलासा

Crime News : एका 47 वर्षीय प्लंबरने आपल्या ओळखीच्या महिला मजुराची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने पीडितेचा मृतदेह चक्क स्वयंपाकघराच्या फरशीखाली खड्डा खोदून विटांच्या साहाय्याने लपवून ठेवला आणि घराला कुलूप लावून फरार झाला. तब्बल पाच महिन्यांपर्यंत हे गुपित दडपलेले राहिले, मात्र जेव्हा बंद घरातून असह्य दुर्गंधी येऊ लागली आणि घरमालकाने दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा स्वयंपाकघराच्या खाली महिलेचा सडलेला सांगाडा आढळल्याने सर्वांचेच झोप उडाली. मल्काजगीरी पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून आरोपी प्लंबरला अटक केली असून, या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

दारूच्या नशेत झालेल्या अपमानाचा सूड; 15 डिसेंबरच्या रात्री घडले हत्याकांड

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी प्लंबर आपल्या कुटुंबापासून वेगळा भाड्याच्या खोलीत राहत होता आणि त्याची ओळख एका मजूर अड्ड्यावर 47 वर्षीय पीडित महिलेशी झाली होती. 15 डिसेंबर 2025 रोजी काम न मिळाल्याने या दोघांनी प्रथम दारूच्या दुकानाजवळ आणि नंतर आरोपीच्या घरी बसून मद्यप्राशन केले. दारूच्या नशेत असताना महिलेने आरोपीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही अपमानजनक टिप्पणी केली, ज्यामुळे आरोपी प्रचंड संतापला. रागाच्या भरात त्याने लाकडी दांडक्याने महिलेच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला, ज्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर अशा भीषण हत्याकांडात झाल्याने पोलीसही थक्क झाले आहेत.

मृतदेह फरशीखाली गाडून आरोपी झाला पसार; 5 महिन्यानंतर घरमालकामुळे उघडले बिंग

हत्या केल्यानंतर आरोपीने अत्यंत क्रूरपणे पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केला, त्याने महिलेचे हात-पाय आणि मान दोरीने बांधून स्वयंपाकघराच्या जमिनीखाली गाडले आणि त्यावर विटांचे बांधकाम करून घराला टाळे लावले. पीडित महिलेचा तिच्या कुटुंबाशी संपर्क कमी असल्याने तिची बेपत्ता झाल्याची तक्रारही कोठे नोंदवण्यात आली नव्हती, त्यामुळे आरोपीला पळून जाणे सोपे झाले. तथापि, 17 एप्रिल रोजी जेव्हा अनेक महिन्यांपासून संपर्क न झाल्याने घरमालकाने खोलीचा दरवाजा उघडला, तेव्हा त्यांना स्वयंपाकघरातून दुर्गंधी आली. स्वयंपाकघराचा प्लॅटफॉर्म हटवला असता तिथे महिलेचा सांगाडा सापडला आणि या भयानक गुन्ह्याचा उलगडा झाला.

तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीला बेड्या; पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा

मल्काजगिरिचे पोलीस उपायुक्त (DCP) सी. श्रीधर यांनी दिलेल्या माहितीनुसार,  1 मे रोजी आरोपीला जुबली बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतले. आरोपीने पोलिसांकडे आपला गुन्हा कबूल केला असून, आपण रागाच्या भरात हे कृत्य केल्याचे त्याने सांगितले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून दफन राहिलेल्या या हत्येच्या गुपित उघड झाल्याने पोलिसांनी वेगाने कारवाई करत आरोपीला  कोठडीत पाठवले आहे.