दीर आणि नवऱ्याने दारु पाजली अन् बेडवर.. महिलेसोबत काय घडलं?

आपल्याच भावाच्या चुकीच्या कृत्याला आळा घालण्याऐवजी नवऱ्याने त्याला साथ दिल्याने सगळेच सुन्न झाले आहेत. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी नवरा, दीर आणि सासू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 07:11 AM • 05 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

दीर आणि नवऱ्याने दारु पाजली अन् बेडवर..

point

महिलेसोबत काय घडलं?

Crime News : ज्या नवऱ्यासोबत जन्मभर साथ निभावण्याच्या आणाभाका घेतल्या, त्यानेच आपल्या भावासोबत मिळून बायकोवर अत्याचार केल्याची अत्यंत घृणास्पद घटना समोर आली आहे. आपल्याच भावाच्या चुकीच्या कृत्याला आळा घालण्याऐवजी नवऱ्याने त्याला साथ दिल्याने सगळेच सुन्न झाले आहेत. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी नवरा, दीर आणि सासू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. उत्तराखंडच्या किच्छा परिसरातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

दीराचे अश्लील चाळे आणि नवऱ्याला फोन

मिळालेल्या माहितीनुसार, 9 एप्रिल रोजी रात्री पीडित महिलेचा नवरा घरी नव्हता. याचा फायदा घेत तिचा दीर दारूच्या नशेत तिच्या खोलीत शिरला आणि त्याने तिच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. संकटात सापडलेल्या महिलेने तिथून पळ काढून स्वतःची सुटका केली आणि तातडीने नवऱ्याला फोन करून या गैरप्रकाराची माहिती दिली. आपला नवरा आपली बाजू घेईल आणि दिराला समज देईल, अशी अपेक्षा पीडितेला होती; मात्र प्रत्यक्षात वेगळेच घडले.

हे ही वाचा : भाजप नेत्याचं कांड, लग्नाचं आमिष दाखवून तरुणीचं वारंवार लैंगिक शोषण, कुटुंबीयांनी देखील.. लाज आणणारी घटना

दीर आणि नवऱ्याने दारु पाजली अन्..

दुसऱ्या दिवशी पती घरी आल्यावर त्याने आपल्या भावासोबत बसून मद्यपान केले. त्यानंतर त्याने पत्नीला प्यायला ज्यूस दिला, ज्यामध्ये छुप्या पद्धतीने दारु मिसळण्यात आली होती. तो ज्यूस प्यायल्यानंतर काही वेळातच पीडितेला नशा चढली आणि ती बेडवर झोपली. या अवस्थेत पतीने स्वतःच्या भावासोबत मिळून पत्नीवर अत्याचार केला. विश्वासाच्या नात्याला तडा देणाऱ्या या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

हे ही वाचा : 'आई दादासोबत खिडकी बंद करून..', आईचे-मुलाशी अनैतिक संबंध असल्याचा बापाला संशय; पोराचा झोपेत...

तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी

पीडित महिलेने या अत्याचाराची माहिती आपल्या आई-वडिलांना दिली. जेव्हा तिच्या पालकांनी सासरच्या लोकांशी या विषयावर जाब विचारला, तेव्हा सासरच्या मंडळींनी त्यांना पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर सर्व दबावाला झुगारून महिलेने पुलभट्टा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने FIR नोंदवली असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.