Crime News : दारूमध्ये पाणी न मिसळल्याने एका तरुणाने 9 वर्षाच्या मुलावर गोळीबार करत तिची हत्या केली. या घटनेनं परिसर हादरून निघाला होता, तसेच घटनास्थळी भीतीचे वातावरण पसरले होते. नामकरणाचा कार्यक्रम सुरु असताना ही घटना घडली होती. परिस्थिती बघता, मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशातच आरोपी फरार झाला असून पोलिसांनी त्याला अटक करण्यात आली. संबंधित प्रकरण हे उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यातील आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : एकीकडे नातेवाईकाचं लग्न उत्साहात सुरु, दुसरीकडे जावई अन् सासू शेतात आक्षेपार्ह अवस्थेत सापडले, अन्...
दारूच्या नशेत असलेल्या धनेशने यशच्या पोटावर गोळीबार केला
पोलिसांच्या माहितीनुसार, सहावर पोलीस ठाणे क्षेत्रातील याकूतगंज गावात घडली आहे. मृत मुलीचा काका अनुजने सांगितले की, ही घटना शुक्रवारी घडली होती. जसवीर गोला याच्या घरी नामकरण सोहळा होता. कार्यक्रमात अनेक नातेवाईक आणि लोकांनी उपस्थिति दर्शवली होती. अशातच या कार्यक्रमात धनेश यादव देखील पोहोचला होता. अनुजने पुढे सांगितलं की, धनेश दारू पीत होता आणि त्याने जसवीरच्या नऊ वर्षांचा मुलगा यशपालला पाणी आणण्यास सांगितले. पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, यशने नकार दिला दारूच्या नशेत असलेल्या धनेशने आपला राग अनावर करून यशच्या पोटात गोळी झाडली.
उपचारादरम्यान यशचा दुर्दैवी मृत्यू
पोलिसांच्या माहितीनुसार, गोळीबार होताच कार्यक्रमाच्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली. रक्तस्त्राव होत असलेल्या यशला तातडीने कासगंज जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याची प्रकृती गंभीर झाल्याने डॉक्टरांनी त्याला अलीगढला पाठवण्यात आले. उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी, यशचा मृत्यू झाला. गुन्हा केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.
हे ही वाचा : पुणे : 3 वर्षीय चिमुरड्याची बलात्कार करुन निर्घृण हत्या, बॅगेत लपवला मृतदेह; अल्पवयीन आरोपीला अटक
स्टेशन प्रभारी गोंविद बल्लम शर्मा यांनी पोलिसांनी सांगितलं की, पीडितेच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे तात्काळपणे गुन्हा दाखल करण्यात आला. कासगंज पोलिसांनी तातडीने कारवाई खितौली कालवा पूलानजीक आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. हत्येसाठी वापरलेले पिस्तूल पोलिसांनी जप्त केले.
ADVERTISEMENT











