एकीकडे नातेवाईकाचं लग्न उत्साहात सुरु, दुसरीकडे जावई अन् सासू शेतात आक्षेपार्ह अवस्थेत सापडले, अन्...
UP Crime News : उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एक धक्कादायक घटना समोर आली असून, लग्नाचे निमित्त साधून एक सासू आपल्या पाच मुलांच्या वडिला असलेल्या जावयासोबत पळून गेली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
एकीकडे नातेवाईकाचं लग्न उत्साहात सुरु
दुसरीकडे जावई अन् सासू शेतात आक्षेपार्ह अवस्थेत सापडले, अन्...
UP Crime News : उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यामध्ये माणुसकीला आणि सामाजिक मर्यादांना काळिमा फासणारी एक अत्यंत लाजीरवाणी घटना समोर आली आहे. एका सासूने नात्याच्या सर्व मर्यादा पायदळी तुडवत आपल्याच जावयासोबत घर सोडून पलायन केले आहे. ही घटना एखाद्या चित्रपटाला शोभावी अशी असून गावात एका कौटुंबिक लग्नाचा उत्साह असताना ही घटना घडली. पाच मुलांचा पिता असलेला जावई शुक्रवारी आपल्या सासरी लग्नासाठी आला होता. सामान आणण्यासाठी बाहेर गेलेले दोघं बराच वेळ दोघेही परत न आल्याने नातेवाईकांनी शेताकडे धाव घेतली असता त्यांना दोघेही आक्षेपार्ह स्थितीत दिसले. आरडाओरडा होताच जावई आपल्या सासूला दुचाकीवर बसवून फरार झाला.
12 वर्षांचे अनैतिक संबंध आणि जुन्या प्रकरणाची पुनरावृत्ती
या संतापजनक प्रेमप्रकरणाची पाळेमुळे तब्बल 12 वर्षे जुनी असल्याचे तपासात समोर आले आहे. दोन सख्ख्या भावांचे विवाह दोन सख्ख्या बहिणींशी झाले होते, मात्र मोठ्या जावयाचे आपल्या सासूशी असलेले जवळचे संबंध लग्नाच्या तीन वर्षांनंतरच वाढले होते. धक्कादायक बाब म्हणजे, 12 वर्षांपूर्वी सुद्धा ही जोडी समाजाची सर्व बंधने तोडून पळून गेली होती. त्यावेळी त्यांना दिल्लीतून शोधून परत आणण्यात आले होते आणि लोक लाजेस्तव हा विषय तिथेच मिटवण्यात आला होता. मात्र, मनात असणारी ती आग विझली नव्हती आणि या सासू-जावयाने पुन्हा एकदा संधी मिळताच समाजाला आणि कुटुंबाला वाऱ्यावर सोडले.
दोन हसती-खेळती कुटुंबे उद्ध्वस्त; मुलांच्या भविष्याचा प्रश्न
या अनैतिक संबंधामुळे दोन सुखी आणि हसत्या-खेळत्या कुटुंबांची अक्षरशः राखरांगोळी झाली असून सर्वत्र बदनामी आणि अश्रू पाहायला मिळत आहेत. आठ मुलांचा पीडित वडील आणि महिलेचा पती सध्या कमालीच्या धक्क्यात आहे. दुसरीकडे, आरोपी जावयाची पत्नीची अवस्थाही बिकट आहे. एकाच क्षणात तिच्या आईने आणि पतीने तिचा विश्वासघात केलाय, तिची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. या कृत्यामुळे केवळ पती-पत्नीच्या नात्याला तडा गेला नाही, तर या दोन्ही कुटुंबातील निष्पाप मुलांच्या भविष्यावरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वासनेच्या आहारी जाऊन रक्ताची नाती विसरल्याने संपूर्ण परिसरात या घटनेची चर्चा सुरू असून संताप व्यक्त केला जात आहे.









