13 वर्षीय मुलीच्या घरात तरुण घुसला, हात पाय बांधून दोन वेळा..

Crime News : एका तरुणाने 13 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून दोन वेळा लैंगिक अत्याचार केले. आरोपी तरुण गावातीलच असल्याचे सांगण्यात येते. तरुणाने पीडितेचे हातपाय बांधून तिच्यावर अत्याचार केला, ही घटना 20 जून रोजी घडली होती.

Crime News

Crime News

मुंबई तक

23 Jun 2026 (अपडेटेड: 23 Jun 2026, 04:10 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

13 वर्षीय पीडितेवर गावातील तरुणाकडून लैंगिक अत्याचार

point

पीडितेनं घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला

Crime News : राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातीस खाजूवाला मध्ये 13 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून दोन वेळा लैंगिक अत्याचार केले. आरोपी तरुण गावातीलच असल्याचे सांगण्यात येते. तरुणाने पीडितेचे हातपाय बांधून तिच्यावर अत्याचार केला. ही घटना 20 जून रोजी घडली होती, भीतीमुळे मुलगी गप्प राहिली होती. तिच्या कुटुंबीयांनी तिला वारंवार विचारपूस केली असता, तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. संबंधित प्रकरणाची आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : फुटपाथवरुन 11 वर्षीय मुलीचे अपहरण, जंगलात आढळला मृतदेह, काय घडलं?

13 वर्षीय पीडितेवर गावातील तरुणाकडून लैंगिक अत्याचार

पोलिसांच्या माहितीनुसार, खाजूवाला पोलीस ठाणे परिसरातील एका गावात हा माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पीडितेचे (वय 13) हात पाय बांधून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. या घटनेनंतर आरोपीने लहान मुलीला धमकी दिली की, जर कोणाला काही सांगितल्यास मारण्यात येईल. धमकीनंतर पीडित मुलगी भयभीत झाली आणि शांतच राहू लागली होती. 

पीडितेनं रडत रडत घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला

कुटुंबीयांतील लोकांना मुलीच्या वागण्यात बोलण्यात बदल झाल्याचं जाणवलं. नंतर त्यांनी तिची सातत्याने विचारपूस केली. अनेकदा तिची विचारपूस केल्यानंतर पीडितेनं रडत रडत घडलेला सर्व प्रकार सांगितला. कुटुंबीयांना याबाबत माहिती मिळताच, त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी पीडितेचा मेडिकल तपास केल्यानंतर प्रकरण हाताळलं. 

हे ही वाचा : नागपूर: 14 वर्षीय मुलासोबत मदरशात अनैसर्गिक कृत्य, इतर काही मुलं..

पोलिसांनी आरोपीची ओळख केली असून अटक करण्यासाठी त्याचा तपास सुरू केला आहे. आरोपीच्या अटकेसाठी ठिकठिकाणी तपास छापे टाकून तपास केला जात आहे. पोलिसांनी स्थानिकांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. घटनेची माहिती मिळताच गावात मोठा आक्रोश निर्माण झाला होता. ग्रामीण भागात आरोपी विरोधात कारवाईची मागणी केली आहे.