नागपूर : 'अंकल बॅड टच करतात...' शिक्षिकेला 7 वर्षीय चिमुकलीनं सांगितला भयंकर प्रकार, आईला कळताच....

योगेश पांडे

15 Oct 2026 (अपडेटेड: 15 Oct 2026, 05:49 PM)

नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेत गुड टच आणि बॅड टच शिकवत असताना एका सात वर्षीय मुलीने शिक्षिकेला बॅड टचविषयी सांगितले. यानंतर एक भयंकर प्रकार समोर आला.

Nagpur Crime

Nagpur Crime

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

सात वर्षीय चिमुकलीसोबत घडला भयंकर प्रकार

point

47 वर्षीय आरोपीला अटक

Nagpur Crime : शाळांमध्ये शिक्षणासोबतच सामाजिक आणि नैतिक मूल्ये शिकवली जातात. यामधीलच एक महत्त्वाचं म्हणजे गुड टच आणि बॅड टच. यासंदर्भातच नागपूरमध्ये एका 7 वर्षांच्या चिमुकलीच्या बाबतीत एक भयंकर घटना घडली आहे. शाळेत मिळालेल्या शिक्षणामुळे या चिमुकलीने आपल्यावर झालेल्या अत्याचाराचा पर्दाफाश केला, ज्यामुळे एका नराधम आरोपीला तुरुंगात जावे लागले आहे.

हे वाचलं का?

47 वर्षीय आरोपीला अटक

ही खळबळजनक घटना नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत 47 वर्षीय राजेश कनोजिया नावाच्या आरोपीला अटक केली आहे. हा संपूर्ण प्रकार 30 जून ते 13 ऑक्टोबर दरम्यान घडल्याचे समोर आले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीने पावले उचलली. 

हे ही वाचा : CJP च्या पत्रकार परिषदेत गोंधळ अन् घोषणाबाजी, नेहा बोरा बोलत असताना काय घडलं? दिपकेंनी चांगलंच सुनावलं!

'असं' बाहेर आलं प्रकरण

शाळेमध्ये शिक्षिका विद्यार्थ्यांना 'गुड टच आणि बॅड टच' याविषयी माहिती देत ​​होत्या. हा पाठ शिकवत असताना 7 वर्षांच्या निष्पाप मुलीने हिंमत दाखवून शिक्षिकेला आपल्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. तिने सांगितले की, त्यांच्याच घरी भाडेकरु म्हणून राहणारा अंकल तिच्यासोबत वाईट स्पर्श करून अश्लील चाळे करतो.

हे ही वाचा : 14 वर्षीय मुलीचा अर्धनग्नावस्थेत सापडला मृतदेह, 500 जणांच्या चौकशीनंतर धक्कादायक उलगडा

आईने काय केलं?

शिक्षिकेकडून माहिती मिळाल्यानंतर पीडित मुलीच्या 32 वर्षीय आईने तातडीने पाचपावली पोलीस ठाण्यात येऊन अधिकृत तक्रार नोंदवली. आरोपी हा मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या खोलीत बोलावून घ्यायचा आणि कोणालाही न सांगण्याची धमकी देऊन अश्लील कृत्ये करायचा. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी राजेश कनोजियाला अटक केली असून, सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.