स्मशानभूमीत पुजाऱ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ! पोलीस तपासात धक्कादायक उलगडा

मुंबई तक

• 07:11 AM • 10 Nov 2026

एका पुजाऱ्याचा स्मशानभूमीत मृतदेह आढळल्याने कटिहार जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही हत्या नेमकी का करण्यात आली?

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

पुजाऱ्याची निर्घृण हत्या

point

नेमकं कारण काय?

point

पोलिसांनी केला धक्कादायक उलगडा

Crime News : एका 70 वर्षीय पुजाऱ्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. जमीन किंवा पैशांच्या वादातून नव्हे, तर अंधश्रद्धेपोटी ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. गावातीलच ६५ वर्षीय शेजारी अनंतलाल मंडल याला पुजाऱ्यांच्या जादूटोण्यामुळे आपल्या सहा महिन्यांच्या नातवाचा मृत्यू झाल्याचा संशय होता, ज्यातून हा भयानक प्रकार घडला. हिरालाल मंडल असं मृत पुजाऱ्याचं नाव आहे. बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

स्मशानभूमीत आढळला मृतदेह

मिळालेल्या माहितीनुसार, 1 नोव्हेंबरच्या संध्याकाळी पुजारी मंदिराबाहेर पडले पण घरी परतले नाहीत. दुसऱ्या दिवशी, 2 नोव्हेंबर रोजी गावातील स्मशानभूमीतील एका झाडाला त्यांचा मृतदेह लटकलेला आढळला. त्यांच्या शरीरावर धारदार शस्त्रांच्या जखमा होत्या, ज्यामुळे कुटुंबीयांनी हत्येचा संशय व्यक्त केला आणि पोलिसांनी तात्काळ तपासासाठी विशेष पथक (SIT) नेमले.

हे ही वाचा : Govt Jobs : इंडियन ऑईलमध्ये मोठी भरती, काय आहेत पात्रतेचे निकष? जाणून घ्या सविस्तर

हत्या का केली?

पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि फॉरेन्सिक तपासानंतर अनंतलाल मंडल याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपल्या दोन मुलांसह मिळून पुजाऱ्याची हत्या केल्याची कबुली दिली. एका वर्षापूर्वी त्याच्या नातवाचा मृत्यू झाला होता, ज्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी पुजाऱ्याला स्मशानभूमीत नेऊन धारदार चाकूने त्यांची हत्या केल्याचं आरोपीने सांगितलं.

हे ही वाचा : कंडका पाडणे म्हणजे नक्की काय? सतेज पाटलांनी सांगितला अर्थ

आरोपीच्या घरात सापडसे पुरावे

पोलिसांनी मुख्य आरोपी अनंतलालला अटक केली असून त्याच्या दोन्ही मुलांच्या शोधासाठी शोधमोहीम सुरू आहे. पोलिसांनी आरोपीच्या घरातून पुजाऱ्याची माळ आणि हत्येत वापरलेला चाकू देखील जप्त केला आहे. बारसोईचे डीएसपी मंगलेश कुमार सिंह यांनी या घटनेची पुष्टी केली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.