नागपूर: सुनेनं सासूचं सोनं केलं चोरी अन् विकत घेतला iPhone नंतर..

योगेश पांडे

• 05:19 PM • 09 Nov 2026

Nagpur Crime News : नागपूरच्या शांतीनगर येथून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुनेनं घरात घुसून सासुचे 53 ग्रॅम सोने लंपास केल्याची ही घटना आहे. नंतर सुनेनं त्याच सोन्यांच्या पैशांतून आयफोन मोबाइलची खरेदी केली.

Nagpur crime news

Nagpur crime news

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

सुनेनं सासूचे चोरले दागिने 

point

दागिने विकून आयफोन घेतला विकत 

Nagpur Crime News : नागपूरच्या शांतीनगर येथून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुनेनं घरात घुसून सासुचे 53 ग्रॅम सोने लंपास केल्याची ही घटना आहे. नंतर सुनेनं त्याच सोन्यांच्या पैशांतून आयफोन मोबाइलची खरेदी केली. सासू शिर्डीला जाण्याच्या तयारीत होती, इतक्यात तिने कपाटाचा दरवाजा खोलला असता, कपाटात दागिनेच नव्हते, या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. सुनेची ओळख ग्रंथली अशी समोर आली . 

हे वाचलं का?

हे ही वाचा : लातूरमध्ये संपत्तीवरून वाद, दुसऱ्या बायकोच्या 7 वर्षीय मुलाची बापानं केली हत्या

सुनेनं सासूचे चोरले दागिने 

ग्रंथली ही कधी माहेरी तर कधी सासरी राहायची. या कौटुंबिक वादातून घरातील दागिने गायब झाल्याची घटना आहे. ही घटना 27 जुलै 2026 रोजी घडली होती. फिर्यादी सासूला शिर्डी दर्शनासाठी जायचे होते. तिला सोने परिधान करण्यास हवे असल्याने तिने कपाट उघडले असता, कपाटात सोनेच आढळून आले नाही. हे बघताच सासूच्या पायाखालची जमीन सरकली. 

दागिने विकून आयफोन घेतला विकत 

यानंतर कुटुंबातील सर्वच सदस्यांना दागिन्यांबाबत विचारण्यात आले, मात्र कोणालाच दागिने चोरीला गेलेत हे ठाऊक नव्हते. त्यानंतर ग्रंथलीला खडसावले असता, तिने दागिने विकून आयफोन मोबाइल फोन खरेदी केल्याचे कबूल केले होते. चोरी केलेल्या दागिन्यात 30 ग्रॅमचे मंगळसूत्र, 13 ग्रॅम सोन्याचा हार, इतर 10 ग्रॅस सोन्याचा समावेश होता. या एकूण सोन्यांचा अंदाजे खर्च हा 2 लाख 50 हजार रुपये असल्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा : छत्रपती संभाजीनगर: रोहित पठारे तरुणाला अमानुष मारहाण अन् मृत्यू, 10 जण अटकेत

तक्रारदाराने तिच्या सुनेला सोन्याचे दागिने परत करण्यास सांगितले असता, तिने दागिने परत करण्यास नकार दिला. अखेर तक्रारदाराने पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला. शांतीनगर पोलिसांनी आरोपी सुनेविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.