छत्रपती संभाजीनगर: रोहित पठारे तरुणाला अमानुष मारहाण अन् मृत्यू, 10 जण अटकेत

अतिक शेख

• 02:26 PM • 09 Nov 2026

Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगर येथील वैजापूरमध्ये मन सुन्न करून टाकणारा लज्जास्पद प्रकार उघडकीस आला आहे. एका बौद्ध समाजातील तरुण रोहित पठारे यांची अत्यंत अमानुषपणे हत्या केल्याची दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणी आता आंबेडकरवाद्यांनी प्रशासनाला प्रश्न करत आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.

crime News

crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

छत्रपती संभाजीनगर येथील वैजापूरमध्ये मन सुन्न करून टाकणारा प्रकार

point

रोहित पठारे तरुणाची निर्घृणपणे हत्या

Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगर येथील वैजापूरमध्ये मन सुन्न करून टाकणारा लज्जास्पद प्रकार उघडकीस आला आहे. एका बौद्ध समाजातील तरुण रोहित पठारे यांची अत्यंत अमानुषपणे हत्या केल्याची दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणी आता आंबेडकरवाद्यांनी प्रशासनाला प्रश्न करत आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. आतापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली, तर 26 जणांविरोधात एफआरआय दाखल करण्यात आली. अशातच इतर आरोपींना पकडण्यास आणि तपासात एवढी दिरंगाई का केली जाते? पीडित कुटुंबावा न्याय मिळून देण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Astrology : 'या' राशींना सतावेल चिंता, 12 राशींचे जाणून घ्या भविष्य

आरोपींचे भाजपशी राजकीय संबंध आहेत का?

या गंभीर प्रकरणात आरोपींचे भाजपशी राजकीय संबंध आहेत का? असा प्रश्न केला. जर असे असेल तर तपासावर कोणताही दबाव येत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर असा कोणताही दाबाव असेल, तर तो तात्काळपणे दूर करावा, या आरोपांची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, असे बहुजन आघाडी  युवा तालुका अध्यक्ष अंकुश कारभारी पठारे म्हणाले. 

पुढे त्यांनी सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या,

1) सर्व आरोपींना तात्काळपणे अटक करावी. 

2) निष्पक्ष आणि पारदर्शकपणे तपास व्हावा. 

3) तपास यंत्रणेवर कोणताही दबाव आणू नये. 

4) पीडित कुटुंबाला न्याय, संरक्षण आणि योग्य ती मदत मिळावी. 

5) तपासात कसर करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याच यावी, अशा मागण्या बहुजन आघाडी  युवा तालुका अध्यक्ष अंकुश कारभारी पठारे यांनी केली. 

हे ही वाचा : 'हसन मुश्रीफ, बंटी पाटलांनी आपापसात बसून निर्णय घ्यावा', गोकुळवरुन मुख्यमंत्री रोखठोक

त्यानंतर ते म्हणाले की, आम्ही जातीविरोधात नाही, आम्ही अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात आहोत. रोहित पठारे यांना न्याय मिळेपर्यंत आमचा संविधानिक मार्गाने संघर्ष सुरूच राहील, अंकुश कारभारी पठारे म्हणाले. अशातच आतापर्यंत दहा जणांना अटक केली असून 26 जणांवर एफआरआय दाखल करण्यात आली.