शाळेत जेवण बनवणाऱ्या महिलेवर वारंवार बलात्कार, गर्भवती राहिली अन् घडलं भयंकर, मुख्याध्यापक फरार

मुंबई तक

• 07:33 AM • 09 Nov 2026

झारखंडमधीस एका शाळेच्या मुख्याध्यापकाने शाळेत जेवण बनवणाऱ्या महिलेवर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

मुख्याध्यापकाचा महिला कर्मचाऱ्यावर वारंवार बलात्कार

point

गर्भवती राहिल्यानंतर काय घडलं?

Crime News : झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक आणि गंभीर घटना समोर आली आहे. येथील एका कॅथोलिक मिशनरी स्कूलच्या मुख्याध्यापकावर एका महिला कर्मचाऱ्याने वारंवार बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. जोसफ सोरेन असे आरोपीचे नाव असून, तो संत अलफोंसा स्कूलचा मुख्याध्यापक आहे. या घटनेनंतर तो सध्या फरार असून, महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.

हे वाचलं का?

महिला गर्भवती राहिली अन्...

पीडित महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, तिला गोड्डा जिल्ह्यातील तिलाबाद मिशनमध्ये आचाऱ्याची (कूक) नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून बोलावण्यात आले होते. त्यानंतर आरोपी जोसफ सोरेनने तिला जीवे मारण्याची व नोकरीवरून काढण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केले. या सततच्या शोषणामुळे महिला गर्भवती राहिल्यावर, आरोपीने तिला बळजबरीने गर्भपाताची औषधे दिली, ज्यामुळे तिच्या प्रकृतीत प्रचंड बिघाड झाला.

हे ही वाचा : चंद्रपूर : अल्पवयीन मुलीला घरासमोर बोलवून लैंगिक अत्याचार, भाजपच्या मंडल अध्यक्षावर गुन्हा

नोकरीवरुन काढून टाकण्याची धमकी

औषध घेतल्यानंतर महिलेला प्रचंड रक्तस्राव (ब्लीडिंग) झाल्याने तिला गोड्डा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले. तिथे तिच्या गर्भाची सफाई करावी लागली आणि प्रकृती गंभीर झाल्यामुळे तिला एक युनिट रक्‍तही द्यावे लागले. विशेष म्हणजे, या उपचाराचा सुमारे 60 हजार रुपये खर्च झाल्याचे सांगून आरोपीने हा खर्च तीच भरला पाहिजे, अशी धमकी दिली आणि विरोध केल्यास नोकरीवरून काढण्याची तंबी दिली.

हे ही वाचा : तुळजापूर हादरले! 18 वर्षीय विद्यार्थ्याची निर्घृण हत्या, माजी नगराध्यक्षासह दोघांना अटक

केंद्रीय राज्यमंत्र्यांची जोरदार टीका

या गंभीर प्रकरणावर राजकारण तापले असून, केंद्रीय राज्यमंत्री संजय सेठ यांनी झारखंड सरकारवर कडाडून टीका केली आहे. पीडित महिला आदिवासी समुदायातील असल्यामुळे ही घटना संथाल परगण्यात आदिवासी मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचे ज्वलंत उदाहरण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, गोड्डाचे एसडीपीओ आकाश भारद्वाज यांनी गुन्हा दाखल झाल्याची पुष्टी केली असून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.