धाराशिवमध्ये प्रेमप्रकरणातून थरार! प्रेयसीला एर्टिगा कारमधून पळवलं; थरकाप उडवणारा व्हिडीओ

गणेश जाधव

08 Nov 2026 (अपडेटेड: 08 Nov 2026, 08:51 AM)

Dharashiv Crime News : धाराशिवच्या कळंब तालुक्यात प्रेमप्रकरणातून तरुणीचे अपहरण करण्यात आले. आरोपींनी तिच्या आईला आणि बहिणीला मारहाण करत कोयत्याने हल्ला केला. अंबाजोगाईत पोलिसांसमोर आरोपीने अर्धा तास गोंधळ घातला. पोलीस कर्मचारी गणेश वाघमोडे यांनी जखमी होऊनही तरुणीची सुटका केली.

Dharashiv Crime News

Dharashiv Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

धाराशिवमध्ये प्रेमप्रकरणातून थरार!

point

प्रेयसीला एर्टिगा कारमधून पळवलं; पोलिसांसमोर अर्धा तास गोंधळ

Dharashiv Crime News : धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात प्रेमप्रकरणातून अपहरण आणि हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बोरडा गावातील एका तरुणीचे अभिजित ऊर्फ तन्या अर्जुन नवाट याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, या प्रेमप्रकरणातून निर्माण झालेल्या वादानंतर अभिजितने आपल्या तीन साथीदारांसह तरुणीच्या घरात प्रवेश केला. यावेळी आरोपींनी तरुणीच्या आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तर तिच्या बहिणीवर धारदार कोयत्याने हल्ला केला. त्यानंतर कुटुंबीयांसमोरच तरुणीला जबरदस्तीने घराबाहेर ओढत एर्टिगा कारमध्ये बसवण्यात आले. आरोपींनी तिला घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे धाराशिव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणातून झालेल्या वादाचे रूपांतर थेट घरात घुसून मारहाण आणि अपहरणाच्या घटनेत झाले.

हे वाचलं का?

हेही वाचा : राणा जगजितसिंह पाटील यांची शरद पवारांशी भेट, सुनेत्रा पवारांच्या पाठीशी माहेरचे कुटुंब उभे?

रस्त्यात येणाऱ्या वाहनांना आणि नागरिकांना कारने दिली धडक 

तरुणीला कारमध्ये बसवल्यानंतर आरोपींनी कळंब शहरातून भरधाव वेगाने गाडी पळवली. यावेळी रस्त्यात येणाऱ्या वाहनांना आणि नागरिकांना कारने धडक दिली. या घटनेत दोघे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपींचा पाठलाग सुरू केला. पोलिसांनी अंबाजोगाई परिसरात एर्टिगा कार अडवली. मात्र, पोलिसांना पाहताच मुख्य आरोपी अभिजित ऊर्फ तन्या नवाट याने हातात धारदार कोयता घेतला. त्यानंतर त्याने पोलिसांसमोर आक्रमक पवित्रा घेतला. 'एकतर मी या मुलीला संपवतो किंवा स्वतःला संपवतो,' अशी धमकी त्याने दिली. यामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. आरोपीने तब्बल अर्धा तास पोलिसांसमोर गोंधळ घातला. त्यामुळे तरुणीची सुटका करण्यासह आरोपीला ताब्यात घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते.

हेही वाचा : दिवाळीपूर्वी FDA ची मोठी कारवाई; Zepto-Blinkitसह 105 खाद्य व्यावसायिकांचे परवाने निलंबित

आरोपीच्या हातातील कोयत्याचा वार लागल्याने गणेश वाघमोडे जखमी

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अत्यंत सावधगिरीने कारवाई सुरू केली. यावेळी पोलीस कर्मचारी गणेश वाघमोडे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आरोपीवर झडप घातली. या झटापटीदरम्यान आरोपीच्या हातातील कोयत्याचा वार लागल्याने गणेश वाघमोडे जखमी झाले. मात्र, त्यांनी दाखवलेल्या धाडसामुळे पोलिसांना मुख्य आरोपी अभिजित ऊर्फ तन्या अर्जुन नवाट याला पकडण्यात यश आले. पोलिसांनी त्याला जेरबंद केले आणि अपहरण झालेल्या तरुणीची सुटका केली. या कारवाईदरम्यान पोलीस कर्मचाऱ्याला दुखापत झाली असली तरी तरुणीची सुखरूप सुटका करण्यात आली. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांमध्ये गणेश वाघमोडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

या प्रकरणात अभिजित ऊर्फ तन्या अर्जुन नवाट, रा. कोठळवाडी याला पोलिसांनी अटक केली आहे. तर त्याचे तीन साथीदार अद्याप फरार आहेत. यामध्ये किरण भागवत तुपारे, रा. बोरगाव, ता. कळंब, अजय रामकिसन माने, रा. परळी रोड बायपास, कळंब आणि साया नावाच्या व्यक्तीचा समावेश आहे. साया याचे पूर्ण नाव समजू शकलेले नाही. पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तरुणीची सुटका करण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आरोपीवर झडप घालणारे पोलीस कर्मचारी गणेश वाघमोडे यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे. प्रेमप्रकरणातून सुरू झालेल्या वादानंतर घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडवली आहे.