Thane News : ठाण्यातील मासुंदा तलावात एक धक्कादायक घटना घडली. या तलावात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 32 वर्षीय महिलेला जीवरक्षक आणि प्रत्यक्षदर्शींच्या प्रसंगावधानामुळे सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. ही घटना शुक्रवारी, 6 नोव्हेंबर रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास घडली. वेळेवर बचावकार्य झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला असून महिला पूर्णपणे सुरक्षित आहे.
ADVERTISEMENT
अमरावतीतून ठाण्याला आली अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिला मूळची अमरावती येथील रहिवासी आहे. कौटुंबिक वादानंतर मानसिक तणावाखाली आल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पतीसोबत झालेल्या वादानंतर ती थेट अमरावतीवरून ठाण्यात आली होती, मात्र ती ठाण्यात कोणाकडे आणि कधी आली याबद्दलची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
हे ही वाचा : विलीनीकरणाला विरोध, चर्चा फेटाळून लावत रोहित पवार जे म्हणाले ते ऐकाच!
तलावाजवळ काय घडलं?
शुक्रवारी रात्री 9:20 च्या सुमारास ही महिला तलाव पाली परिसरात फिरत होती आणि अचानक तिने तलावाच्या पाण्यात उडी घेतली. तलावाजवळ तैनात असलेल्या जीवरक्षकांची नजर तिच्यावर पडताच त्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ पाण्यात धाव घेऊन तिला बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच ठाणे पालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे (RDMC) पथकही घटनास्थळी दाखल झाले.
हे ही वाचा : 'अट्टहास सोडा' मुश्रीफांवर सतेज पाटील चिडले, थेट रोखठोक भूमिका
महिला ठाण्याला का आली?
ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासीन तडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदैवाने या घटनेत महिलेला कोणतीही दुखापत झालेली नाही. बचावकार्यानंतर महिलेला सुरक्षितपणे नौपाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पती-पत्नीमधील वादाचे मुख्य कारण काय होते, याचा तपास सध्या नौपाडा पोलिस करत आहेत.
ADVERTISEMENT












