मित्राच्या मुलीच्या प्रेमात पडला 47 वर्षीय पुरुष, नकार सहन झाला नाही, पेट्रोल घेऊन आला अन्...

पृथ्वीराज पाटील

07 Nov 2026 (अपडेटेड: 07 Nov 2026, 09:57 AM)

एक 47 वर्षीय विवाहित पुरुष त्याच्या मित्राच्या 20 वर्षीय मुलीच्या प्रेमात पडला. मात्र त्या मुलीने नकार दिल्याने त्याने टोकाचं पाऊल उचललं. दिल्लीतील एका कारखान्यात हा धक्कादायक प्रकार घडला.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

मित्राच्या मुलीवर जीव जडला

point

47 वर्षीय पुरुषाने काय केलं?

Crime News : दिल्लीत एक खळबळजनक घटना घडली. एक 47 वर्षीय विवाहित व्यक्तीने त्याच्या मित्राच्या 20 वर्षीय मुलीच्या प्रेमात पडला. तिच्याशी लग्न करण्यासाठी तो आतूर झाला होता. मात्र मुलीने लग्न करण्यास नकार दिल्याने त्याने स्वतःला पेटवून घेतले. संदीप असे मृत व्यक्तीचे नाव असून, तो उत्तर प्रदेशच्या संत कबीर नगरचा राहणारा होता. त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. संदीप अनेकदा आपल्या मित्राच्या घरी जात असे, यादरम्यान त्याची ओळख मित्राच्या मुलीशी झाली. ती तरुणी दिल्लीतील वजीरपूर औद्योगिक क्षेत्रातील एका भांड्यांच्या कारखान्यात कामाला असून, ती दिल्लीत एकटीच राहत होती.

हे वाचलं का?

दोन बाटल्या पेट्रोल घेऊन गेला अन्...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप सतत त्या तरुणीला फोन करत असे, मात्र काही काळापासून तरुणीने त्याच्याशी बोलणे पूर्णपणे बंद केले होते. या गोष्टीमुळे तो प्रचंड तणावात होता. तो काही दिवसांपूर्वी दिल्लीत पोहोचला आणि शुक्रवारी (6 नोव्हेंबर) थेट दोन बाटल्या पेट्रोल घेऊन तरुणी काम करत असलेल्या कारखान्यात पोहोचला. तिथे त्याने तरुणीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि तसा आग्रह धरला, मात्र तिने स्पष्टपणे नकार दिला.

हे ही वाचा : पुण्यात खळबळ! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडले दोन मानवी पाय, पोलिसांनी केला धक्कादायक उलगडा

कारखान्यात काय घडलं?

तरुणीने लग्नास नकार दिल्यानंतर संतापलेल्या आणि नैराश्यात गेलेल्या संदीपने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. ही भयानक घटना घडताच कारखान्यातील इतर कर्मचारी तातडीने मदतीसाठी धावले. त्यांनी कशीतरी आग विझवली आणि गंभीर जखमी झालेल्या संदीपला तातडीने दीपचंद बंधू रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हे ही वाचा : राजकीय मतभेद बाजूला! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची रीघ, ब्रीच कँडी रुग्णालयात काय घडलं?

सुसाइड नोटमध्ये काय?

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून एक सुसाइड नोट जप्त केली आहे, ज्यामध्ये मृत संदीपने तरुणीने मैत्री तोडल्यामुळेच आपण आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. मात्र, तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबाबात संदीपसोबत आपले कोणतेही नाते नव्हते असे स्पष्ट केले आहे. सध्या पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून संदीपच्या कुटुंबीयांना या दुर्दैवी घटनेची माहिती दिली आहे.