अज्ञात वाहतुकीची दुचाकीला जोरदार धडक, अपघातात पतीचा मृत्यू

सुशांत काळे

06 Nov 2026 (अपडेटेड: 06 Nov 2026, 07:11 PM)

Crime News : राष्ट्रीय महामार्गावरील सायगाव जवळील रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने भीषण अपघात होऊन एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ज्यात एकजण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त समोर आले.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

बायको मुलीला भेटून तरुण घरी परतताना भीषण धडकेत मृत्यू 

point

रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संपाताची लाट

Beed Accident : रोहिदास हातागळे - राष्ट्रीय महामार्गावरील सायगाव जवळील रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने भीषण अपघात होऊन एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ज्यात एकजण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त समोर आले, अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाची रत्नदिप भिमराव गजधने (वय 29) अशी ओळख समोर आली. कर गोविंद वाघमारे हा गंभीर जखमी असून त्याच्यावर आंबाजोगाई स्वामी रामानंदा तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : नवी मुंबई हादरली! प्रेमप्रकरणातून सख्ख्या बहिणींवर गोळीबार, एकजण गंभीर जखमी

बायको मुलीला भेटून तरुण घरी परतताना भीषण धडकेत मृत्यू 

घडलेल्या घटनेनुसार, दिवाळी सणासाठी रत्नदिपची पत्नी ही माहेरी गेली होती. पत्नीच्या आणि मुलीच्या भेटीसाठी रत्नदिप मामाच्या मुलासोबत गेला होता. रत्नदिपने दीड वर्षांची मुलगी आणि पत्नीची भेट घेतली, नंतर तो पुन्हा घरी परतला. घरी परतताना सायगाव येथे त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनचालकाने धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, मोटारसायकलचे दोन भाग झाले होते. या भीषण अपघातात रत्नादिपचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर मामाचा मुलगा गोविंद वाघमारे हा गंभीर जखमी झाला. 

रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संपाताची लाट

अपघाताची माहिती मिळताच जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याकरिता रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. मात्र, रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यास तब्बल एक तास उशिरा आल्याचा आरोप उपस्थित नागरिक आणि नातेवाईकांनी केला. अपघातानंतर मदतीची गरज असताना रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संपाताची लाट आहे. 

अपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका वेळेवर न पोहचत नसेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी मदत कोणाकडे मागायची? असा संतप्त सवाल उपस्थित केला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिका सेवेच्या तात्परतेबाबत मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस बर्दापूर करीत आहेत. 

बर्दापूर पोलीस ठाण्याचे एपीआय ज्ञानेश्वर कांबळे यांच्याशी मोबाईल फोनवरून संपर्क केला असता, त्यांनी सांगितलं की, अपघात हा सायगाव जवळ रात्री झाला आहे त्यांची अपघातातील मोटारसायकल पोलीस ठाण्यात आणली असून अद्यापही जबाब देण्यासाठी कोणीही नातेवाईक आलेले नाही. 

हे ही वाचा : राजकीय मतभेद बाजूला! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची रीघ, ब्रीच कँडी रुग्णालयात काय घडलं?

संबंधित प्रकरणात प्राथमिक माहितीनुसार, कोणत्यातरी गाडीने या मोटार सायकलला धडक देऊन गेल्याचा अंदाज आहे. सोबतचा दुसरा तरुण गंभीर जखमी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी रात्रीच दाखल करण्यात आले. सायगाव येथील सय्यद असेंफोद्दीन रियाजुल यांना अपघाताची माहिती मित्रांसोबत घटनेच्या ठिकाणी पोहचून टोल फ्री क्रमाकांवर फोन करून अपघाताची माहिती दिली. मात्र, रुग्णवाहिका एक तास उशिरा आल्याची माहिती त्यांना दिली तसाच व्हिडिओ देखील बनवून सोशल मीडियावर व्हायरल झाला.