नवी मुंबई हादरली! प्रेमप्रकरणातून सख्ख्या बहिणींवर गोळीबार, एकजण गंभीर जखमी

सुशांत काळे

06 Nov 2026 (अपडेटेड: 06 Nov 2026, 05:14 PM)

Navi Mumbai crime : दिवाळी सणाच्या वातावरणात एक मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवी मुंबईत गुरुवारी रात्री कोपरखैरणे परिसरात दोन तरुणींवर अज्ञातांनी गोळीबार केल्याचा दुर्दैवी प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली.

Navi mumbai crime

Navi mumbai crime

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

घराबाहेर उभ्या असलेल्या तरुणीवर गोळीबार 

point

गोळीबार करण्यामागे लव्ह अफेयरचं प्रकरण

Navi Mumbai Crime : दिवाळी सणाच्या वातावरणात एक मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवी मुंबईत गुरुवारी रात्री कोपरखैरणे परिसरात दोन तरुणींवर अज्ञातांनी  गोळीबार केल्याचा दुर्दैवी प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. रितू (वय 22) आणि तन्नू (वय 20) अशी गोळीबार करण्यात आलेल्या तरुणींची ओळख आहे. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचे वृत्त आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : TCS प्रकरणातील निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप, इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल

घराबाहेर उभ्या असलेल्या तरुणीवर गोळीबार 

घडलेल्या घटनेनुसार, हा प्रकार गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कोपरखैरणे येथील सेक्टर 1 च्या एसएस 3 परिसरात घडला. दोघीजणी घराबाहेर उभ्या असताना आरोपीने गोळीबार केला. या प्राणघातक हल्ल्यात एका मुलीच्या कानाजवळ, तर तिच्या दुसऱ्या मुलीच्या पाठित गोळी लागली. त्यानंतर त्या दोन्ही मुलींना मुंबईच्या जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

गोळीबार करण्यामागे लव्ह अफेयरचं प्रकरण

सांगण्यात येतं आहे की, संबंधित मुली या सख्ख्या बहिणी होत्या. दरम्यान, पोलिसांनी दोघी बहि‍णींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली होती. गोळीबार करण्यामागे लव्ह अफेयरचं प्रकरण असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे. 

हे ही वाचा : Astrology : दिवाळीत त्रिग्रही योग तयार होईल, 'या' राशींचे चमकेल भाग्य

अर्जुन चव्हाणला अटक करण्यात आली असून, त्याचा साथीदार राकेश चव्हाण फरार आहे. अटक केलेल्या संशयितांची सखोल चौकशी सुरू असून, कोपरखैराणे पोलीस या हल्ल्यामागील हेतूचा तपास करत आहेत. दरम्यान, या सतत घडत असलेल्या घटनेनं महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.