ड्रायव्हरने सासरचं अख्खं कुटुंब एका वरवंट्यानं संपवलं, शहरभर मृतदेहांचा शोध सुरु; नेमकं काय घडलं?

मुंबई तक

06 Nov 2026 (अपडेटेड: 06 Nov 2026, 12:19 PM)

बेंगलोरमधील कारचालकाने आपल्या पत्नीसह सासरच्या सात लोकांची निर्घृण हत्या केली. यामध्ये एका सात वर्षीय मुलाचाही समावेश आहे. नेमकी हत्या कशासाठी केली?

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

कारचालकाने सात जणांना संपवलं

point

नेमकं कारण काय?

Crime News : एका कॅब चालकाने आपल्या संपूर्ण कुटुंबाची हत्या केल्याची अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. बेंगलोर येथील ही घटना आहे. कौटुंबिक वादातून आणि पत्नीच्या माहेरच्या लोकांशी असलेल्या संपर्काच्या रागातून त्याने आपल्या पत्नीसह तिच्या कुटुंबातील सात जणांची निर्घृण हत्या केली. आरोपी इंदुशेखर याने आपली पत्नी सुनिता, तिची आई रूपावती, तिचे दोन भाऊ शिवकुमार व शंकर, त्यांच्या पत्नी अनुक्रमे दिव्या व नलिनी, आणि सात वर्षांचा भाचा पुनीत यांची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. पत्नीने तिच्या माहेरच्यांशी सतत संपर्क ठेवल्याने निर्माण झालेल्या रागातून हे हत्याकांड घडल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हे वाचलं का?

वरवंट्याने केली हत्या

तपासाच्या प्राथमिक निष्कर्षानुसार, आरोपीने सर्वप्रथम स्वतःच्या पत्नीची हत्या केली. त्यानंतर त्याने आखलेल्या कटानुसार दोन्ही मेहुणे आणि त्यांच्या कुटुंबाला पार्टीच्या बहाण्याने घरी बोलावून घेतले. सर्वजण जमल्यानंतर त्याने वरवंट्याने (grinding stone) ठेचून त्यांची निघृण हत्या केली. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने रक्ताचे डाग रसायनांच्या (chemicals) साहाय्याने साफ केले आणि सातही मृतदेह आपल्या कारमधून नेऊन वेगवेगळ्या निर्जन ठिकाणी फेकून दिले.

हे ही वाचा : गोकुळमध्ये 5 शासन नियुक्त संचालक, आता बंटी पाटलांसाठी राज ठाकरेंची पोस्ट

एकच मृतदेह सापडला

श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या बेपत्ता तक्रारीच्या तपासादरम्यान आरोपी इंदुशेखर याने दिलेली परस्परविरोधी विधाने पोलिसांच्या संशयाला कारणीभूत ठरली, ज्यामुळे या भयंकर प्रकरणाचा उलगडा झाला. त्यानंतर पोलिसांनी नंदी हिल्सच्या पायथ्याशी राबवलेल्या चार तासांच्या शोधमोहिमेदरम्यान शंकर यांचा सात वर्षांचा मुलगा पुनीत याचा मृतदेह हस्तगत केला असून, या प्रकरणात सापडलेला हा पहिलाच मृतदेह आहे.

हे ही वाचा : बीड : पोलीस भरतीत बोगस खेळाडूंचं रॅकेट उघडकीस आणलं अन् झाला मृत्यू, कुटुंबियांचा गंभीर आरोप

इतर मृतदेह कुठे?

पोलीस पथके सध्या उर्वरित सहा मृतदेहांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणच्या परिसरात व्यापक मोहीम राबवत आहेत. आरोपीने दिलेल्या कबुलीजबाबाची सत्यता पडताळणे, घटनेचा अचूक क्रम लावणे आणि न्यायवैद्यक (forensic) पुरावे गोळा करण्याचे काम वेगाने सुरू असून या दुर्देवी घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.