अल्पवयीन मुलांमध्ये प्रेयसीवरुन वाद, निर्जन स्थळी रक्तरंजित कांड; नेमकं काय घडलं?

मुंबई तक

• 12:13 PM • 04 Nov 2026

प्रेमप्रकरणावरुन अल्पवयीन मुलांमध्ये झालेल्या वादाला खूनाचे वळण मिळाले. आपल्या एक्स गर्लफ्रेंडच्या नव्या बॉयफ्रेंडची हत्या करण्याचा काहीजणांचा कट होता. मात्र त्याच्या मित्राचीच हत्या करण्यात आली आहे.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

अल्पवयीन मुलांमध्ये प्रेमप्रकरणावरुन वाद

point

हत्येप्रकरणी तिघांना अटक

point

नेमकं काय घडलं?

Crime News : केरळमधील तिरुवनंतपुरम येथे एका 17 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह एका पोत्यात भरून रिकाम्या जागेत फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रविवारी (1 नोव्हेंबर) दुपारपासून बेपत्ता असलेल्या या मुलाचा मृतदेह मंगळवारी पोलिसांना तपासादरम्यान सापडला. सुरुवातीच्या तपासानुसार गळा आवळून ही हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

हे वाचलं का?

तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी एका 18 वर्षीय तरुणीसह एका 22 वर्षीय उमर नावाच्या तरुणाला अटक केली आहे, तर एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. उमर याच्यावर आधीपासूनच अनेक गुन्हे दाखल असून त्याच्यावर KAAPA कायद्यांतर्गत कारवाई सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हत्या झालेला मुलगा आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे होते.

हे ही वाचा : बीड : ट्रकचा भीषण अपघात, दरीत कोसळल्यानंतर भयानक आग, ड्रायव्हरचा होरपळून मृत्यू

वेगळ्याच मुलाची करायची होती हत्या

मृताच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचा मुख्य उद्देश त्यांच्या मुलाची हत्या करण्याचा नव्हता. आरोपी अल्पवयीन मुलाला प्रत्यक्षात त्याच्या माजी प्रेयसीच्या सध्याच्या प्रियकराचा बदला घ्यायचा होता. त्यासाठी त्याने मृत मुलाला त्या निर्जन स्थळी बोलावून त्याच्या मित्रालाही तेथे घेऊन येण्यास सांगितले. मात्र, मृत मुलाने मित्राला तेथे आणण्यास स्पष्ट नकार दिल्याने आरोपींनी रागाच्या भरात त्याचीच हत्या केली.

हे ही वाचा : पार्थ पवारांचा वाढता दबदबा की NCP चं विलीनीकरण? राष्ट्रवादीचे दिग्गज नेते कशामुळे अस्वस्थ?

वडिलांचा पोलिसांवर आणि तपासावर संशय

या हत्येमागे मोठे कारस्थान असल्याचा संशय मृत मुलाच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. अल्पवयीन आरोपीने इतर मोठ्या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी स्वतःवर हे आळ घेतले असावे, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, सुरुवातीला ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन आरोपीला योग्य चौकशी न करता घरी सोडून दिल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले असून या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे.