मोबाइल हॅक करून बनवले अश्लील व्हिडिओ, पालकांच्या फोनवर शेअर केले अन्..

मुंबई तक

03 Nov 2026 (अपडेटेड: 03 Nov 2026, 03:44 PM)

Crime News : नीट परीक्षेची तयारी करत असलेल्या तरुणाला काही सायबर हॅकर्सने त्रास दिला. हॅकर्सने संबंधित मुलाचा मोबाइल फोन हॅक करून मुलाचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो त्याच्याच पालकांच्या मोबाइलवर पाठवले होते.

dozen obscene videos featuring underage boys girls in a hotel have gone viral but there is one thing common in all video

प्रातिनिधिक फोटो

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी 

point

हॅकर्सने अश्लील फोटो आणि व्हिडिओ पालकांच्या मोबाइवर पाठवले

Crime News : नीट परीक्षेची तयारी करत असलेल्या शिवा सिंह (वय 20) नावाच्या तरुणाला काही हॅकर्सने प्रचंड त्रास दिला. याच त्रासातून विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलून स्वत:ला संपवले. सायबर गुन्हेगारांनी शिवाचा मोबाईल फोन हॅक करून अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार केल्याचा आरोप करण्यात आला. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली आणि सतत पैशांची मागणी करत होते. हॅकर्सनी विद्यार्थ्याच्या वडिलांचा मोबाईल नंबर मिळवून त्यांच्या व्हॅट्सअॅपवरही मुलीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवले होते, तेव्हा तर हद्दच ओलांडली गेली. रविवारी रात्री उशिराने रावतपूरच्या तुळसीनगर वसतिगृहाच्या खोलीत शिवाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकूण तिथे पोहोचलेले कुटुंबीय व्याकूळ झाले. हा प्रकार उत्तर प्रदेशातील कानपूर येथील आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : मुरासू वादळामुळे राज्यातील नेमक्या कोणत्या भागांत पाऊस?

शिवा सिंह हा एक अत्यंत हुशार मुलगा होता. त्याने 2024 मध्ये इंटरमिजिएट परिक्षेत अव्वल स्थान पटकावलं होते. डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो 2025 मध्ये कानपूर येथे आला होता. नीट परिक्षेची तयारी करत होता, रावतपूरच्या तुळसीनगरमध्ये एका वसतिगृहात आपला वर्गमित्र दीपक गोस्वामीसोबत राहत होता. 

फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी 

चंद्रवीर सिंह यांच्या म्हणण्यांनुसार, शिवाने शुक्ववारी फोन करून सांगितलं की, त्याचा मोबाइल फोन हॅक झाला. हॅकर्स सतत फोन करून पैशांची मागणी करत होता. तसेच पैसे न दिल्यास त्याचे काही व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करेन अशी धमकी देत होता. त्याच्या वडिलांनी त्याला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला आणि बहराइचमधील हुजूरपूर पोलीस ठाण्यात सायबर गुन्हेगारांविरुद्ध तक्रार दाखल केली. असे असूनही, धकम्या सुरूच राहिल्या. रविवारी, शिवाने त्याचा काका, रणजीत यांच्याकडे एक हजार रुपयांची मागणी केली. त्याच्या काकांनी ऑनलाइन पैसे पाठवले, मात्र हॅकर्सने अती करण्यास सुरू केले. 

हॅकर्सने अश्लील फोटो आणि व्हिडिओ पालकांच्या मोबाइवर पाठवले

हॅकर्सने शिवाचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ त्याच्या आई वडिलांना मोबाइलवर पाठवले. यामुळे तो विद्यार्थी अधिकच मानसिकदृष्ट्या खचून गेला होता. त्याला स्वत:ला आणि कुटुंबाच्या सामाजिक प्रतिष्ठेची अधिक काळजी वाटू लागली होती. त्याच रात्री रविवारी खोलीस शिवाने गळफास घेत जीवन संपवलं. जेव्हा त्याचा रूममेट दीपक गोस्वामी खोलीत पोहोचला, तेव्हा दरवाजा आतून बंद होता. अनेकदा हाक मारूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. जेव्हा त्याने खिडकीतून डोकावून पाहिले, तेव्हा त्याला शिवाचा मृतदेह फासाला लटकलेल्या स्वरूपात आढळला होता. घटनेची माहिती मिळताच, फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी पोहोचले आणि पुरावे गोळा केले, तसेच मोबाइल फोन देखील जप्त केला. 

हे ही वाचा : Astrology : शनीच्या नक्षत्रातील बदल, 'या' राशींचे भाग्य उजळेल

या प्रकरणात अद्याप तक्रार दाखल झालेली नाही. मोबाइल फोन जप्त करण्यात आला असून तपास सुरू आहे. तक्रार मिळाल्यानंतर आणि तपासातून तथ्य समोर आल्यावर गुन्हा दाखल करन कारवाई केली जाणार आहे.