Mumbai News : मुंबईतील भांडूप येथे विवाह सोहळा सुरु असताना एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. लग्नात वऱ्हाडी मंडळींनी जेवण केल्यानंतर त्यांच्या अचानक पोटात दुखू लागले आणि काही वऱ्हाडींना अचानक उलटी-जुलाबाचा त्रास झाला. एवढंच नाही,तर वधू आणि वराला या दोघांनाही रुग्णालयात जावे लागले. अचानक आनंदाच्या सोहळ्याला कोणाची नजर लागली? असा प्रश्न उपस्थित झाला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Astrology : 'या' राशीला व्यवसायत मिळणार नफा,12 राशींची स्थिती काय?
त्यानंतर रुग्णांनी परिस्थिती पाहून त्यांना बीएमसीच्या अग्रवाल रुग्णालयासह इतर काही रुग्णालयांत हलवण्यात आले होते. रात्री सुमारे 11.40 वाजता रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. एकानंतर एक रुग्ण रुग्णालयात पोहोचल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.
11 महिला, 9 पुरुष आणि 7 लहान मुलं रुग्णालयात दाखल
अग्रवाल रुग्णालयाचे मेडिकल ऑफिसरच्या माहितीनुसार, रुग्णालयात एकूण 27 रुग्णांना दाखल करण्यात आले होते. ज्यात 11 महिला, 9 पुरुष आणि 7 लहान मुलांचा समावेश होता. मेडिक ऑफिसरने माहिती देत सांगितलं की, सर्व पेशंटला प्राथिमिक उपचार आणि औषध दिले जात आहे. महत्त्वाची बाब अशी की, सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे. जोपर्यंत उल्टी आणि डिहायड्रेशन नियंत्रित होत नाही तोवर डॉक्टरांचे रुग्णांवर कडक नजर असणार आहे.
कॅटरर्सवर बेजबाबदारपणा केल्याचा आरोप
विवाहात जे अन्न बनवण्यात आले होते, यानंतर वधुसह वर आणि वऱ्हाड्यांची प्रकृती बिघडली. यावरून आता कॅटरर्सवर बेजबाबदारपणा केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी एफडीए कमिश्नरकडे कारवाईची मागणी केली जात आहे. कुटुंबीयांचा दावा असा की, जेवणाची गुणवत्ता अगदीच खराब झाली. मोठ्यांपासून ते लहान मुलांच्या जीवावर बेतलं असतं.
हे ही वाचा : पुणे, बारामती आणि कोल्हापुरात पावसाचा कहर, एका रात्रीत चित्र बदललं, कुठे विक्रमी नोंद?
विवाहात लोक ढोलांच्या तालावर नाचत होते आणि नवविवाहित जोडपे आयुष्याच्या नव्या सुरुवातीची स्वप्ने पाहत होते, तिथे रात्री उशिरा लग्नाच्या पोशाखात सजलेले वधू-वर रुग्णालयाच्या पलंगावर सलाईल लावताना दिसत आहे.
ADVERTISEMENT












