पार्किंगच्या वादातून थरारक हत्याकांड, मर्चंट नेव्ही ऑफिसरने एकाच कुटुंबातील तिघांना संपवलं

मुंबई तक

• 07:11 AM • 02 Nov 2026

लखनऊमध्ये पार्किंगच्या बांधकामावरून सुरू असलेल्या दीर्घकालीन वादातून, मर्चंट नेव्हीच्या एका माजी अधिकाऱ्याने एका कुटुंबातील तिघांची गोळ्या झाडून हत्या केली. गोळीबारानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

माजी मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली तिघांची हत्या

point

तिहेरी हत्याकांडाने खळबळ

Crime News : लखनऊमध्ये पार्किंगच्या वादातून एका माजी मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने शेजाऱ्याच्या कुटुंबातील तीन जणांची गोळ्या झाडून हत्या केली. ही धक्कादायक घटना सोमवारी (26 ऑक्टोबर) घडली. या गोळीबारानंतर आरोपीला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे. ऋषभ शुक्ला असे आरोपीचे नाव असून तो मर्चंट नेव्हीमध्ये नेव्हिगेशन ऑफिसर म्हणून कार्यरत होता.

हे वाचलं का?

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, नौबस्ता भागात हा प्रकार घडला. सेवानिवृत्त सचिवालयातील कर्मचारी शिवाजी तिवारी, त्यांचे भाऊ शिवेंद्र उर्फ शंभू तिवारी आणि शिवाजी यांचा मुलगा सुयश तिवारी अशी मृतांची नावे आहेत. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, एका रिकाम्या जागेत असलेल्या वटवृक्षाजवळ सिमेंटचा कट्टा बनवणे आणि पार्किंगच्या जागेवरून या दोन कुटुंबांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. सोमवारी तिवारी कुटुंबातील सदस्यांनी कट्टा बांधण्याचे काम सुरू केले असता, आरोपी ऋषभ शुक्ला हातात शस्त्र घेऊन तिथे पोहोचला आणि यावरून दोन्ही पक्षांमध्ये जोरदार वाद झाला.

हे ही वाचा : पाच अल्पवयीन मुलींवर बलात्कार, वृत्तपत्र मालकाला 10 वेळा जन्मठेपेची शिक्षा; काय आहे प्रकरण?

वाद झाला अन् केला अंदाधुंद गोळीबार

वाद वाढल्यानंतर ऋषभने आधी तिवारी कुटुंबावर काठ्यांनी हल्ला केला आणि त्यानंतर थेट पिस्तूल काढून त्यांच्यावर अंधाधुंध गोळीबार केला. या प्राणघातक हल्ल्यात शिवाजी तिवारी आणि त्यांचा मुलगा सुयश यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या शंभू तिवारी यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. पुढील महिन्यात सुयशचा विवाह होणार असल्याने तिवारी कुटुंबात लग्नाची लगबग सुरू होती. मात्र या ट्रिपल मर्डरच्या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हे ही वाचा : पाच अल्पवयीन मुलींवर बलात्कार, वृत्तपत्र मालकाला 10 वेळा जन्मठेपेची शिक्षा; काय आहे प्रकरण?

पोलिसांनी काय सांगितलं?

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी ऋषभ शुक्लाला ताब्यात घेतले आणि परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला. पोलीस आयुक्त तरुण गाबा यांनी घटनास्थळाची पाहणी करून पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. पोलिसांनी सांगितले की, जुन्या वादातूनच हा गोळीबार झाला आहे. सध्या सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई वेगाने सुरू आहे.