पालघर: महापालिका रुग्णालयात रुग्णाला बेडवरच लाथाबुक्क्यांनी मारहाण 

मुंबई तक

• 05:37 PM • 31 Oct 2026

Palghar crime : वसई-विरार महापालिकेच्या नालासोपारा येथील एका रुग्णालयात कायदा आणि सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या एका रुग्णाला थेट बेडवरच बेदम मारहाण केल्याची लज्जास्पद घटना आहे.

Palghar crime

Palghar crime

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

रुग्णाला बेडवरच लाथाबुक्क्यांनी मारहाण 

point

कर्मचाऱ्यांच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित

Palghar Crime : प्रवीण नलावडे - वसई-विरार महापालिकेच्या नालासोपारा येथील एका रुग्णालयात कायदा आणि सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या एका रुग्णाला थेट बेडवरच बेदम मारहाण केल्याची लज्जास्पद घटना आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, यामुळे रुग्णालयातील व्यवस्थापनेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : सांगली: मतिमंद मुलीवर घरात घुसून लैंगिक अत्याचार, बाप-लेकाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

रुग्णाला बेडवरच लाथाबुक्क्यांनी मारहाण 

घडलेल्या घटनेनुसार, कलीमुल्ला खान हे नालासोपारा येथील महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत होते. दरम्यान, रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना समोर आली. यानंतर दोन ते चार जण अचानकपणे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनी उपचार घेत असलेल्या कलीमुल्ला खान यांना बेडवरच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला होता. 

कर्मचाऱ्यांच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित

विशेष बाब म्हणजे, रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी ही घटना घडल्याने सुरक्षारक्षक आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. रुग्णालयात उपचार घेणारे रूग्णही सुरक्षित नसतील, तर सर्वसामान्य नागरिकांनी नेमका कोणावर विश्वास ठेवायचा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

हे ही वाचा : नालासोपाऱ्यात थेट बेसमेंटमध्ये कोसळली लिफ्ट, सात ते आठ जण जखमी

या घटनेमुळे वसई-विरार महापालिकेच्या रुग्णालयांतील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. यामुळे संबंधित रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर आणि रुग्णांच्या सुरक्षिततेबाबतचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.