Sangli Crime : स्वाती चिखलीकर - सांगली जिल्ह्यातील मिरज शहरातून मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील जुना गांधीनगर रस्त्यावर मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची ही दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणी बाप-लेकाला पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आहे. अमन चाँद पटेल आणि चाँद मीरासाब पटेल अशी आरोपींची ओळख समोर आली आहे. या प्रकरणात पीडितेच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे वृत्त आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : नालासोपाऱ्यात थेट बेसमेंटमध्ये कोसळली लिफ्ट, सात ते आठ जण जखमी
मतिमंद मुलीच्या घरात घुसुन लैंगिक अत्याचार
पीडितेचे आई-वडील हे मजुरीचे काम करतात, त्यामुळे पीडिता घरात एकटीच असते. या प्रकरणातील संशयित हे पीडितेचे नातेवाईक असल्याची माहिती समोर आली. 29 ऑक्टोबर रोजी आरोपी अमन पटेल हा या मतिमंद मुलीच्या घरात घुसला, नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर चाँदने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला, अशा स्थितीत पीडित मुलगी अगदीच भयभीत झाली होती.
अमन पटेल आणि चाँद पटेल या दोघांवर गुन्हा दाखल
पीडितेची अवस्था पाहून तिला तिच्या आईने विश्वासात घेतले, नंतर तिला याबाबत विचारले. तेव्हा पीडितेनं आईला आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला होता. या प्रकरणाची माहिती आईने फिर्यादीत नमूद करण्यास सांगितली. त्यानंतर मिरज पोलिसांनी अमन पटेल आणि चाँद पटेल या दोघांवर गुन्हा दाखल करून अटक केली.
हे ही वाचा : गे डेटिंग अॅपवर मैत्री, नंतर विश्वासघात... 20 लाखांचे लुटले दागिने
महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
दरम्यान, देशभरात महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खेडेगाव असो किंवा ग्रामीण भाग, महिलांवर लैंगिक अत्याचारांच्या घटनेत सातत्याने वाढ होऊ लागली आहे. यामुळे आता महिला आणि मुलींच्य्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
ADVERTISEMENT












