वाशिम: 19 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार, दुकानदारानं केलं गर्भवती

मुंबई तक

• 06:03 PM • 30 Oct 2026

Washim news : वाशिम येथून मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेच्या शेजारी राहणार्‍या दुकानदाराने महिलेला गर्भवती केल्याची दु्र्दैवी घटना समोर आली. या प्रकरणी आरोपीवर लैंगिक अत्याचार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Washim news

Washim news

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

19 वर्षीय पीडित तरुणीवर किराना दुकानदाराकडून लैंगिक अत्याचार 

point

तरुणी गर्भवती राहिली

Washim News : जका खान - वाशिम येथून मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेच्या शेजारी राहणार्‍या दुकानदाराने महिलेला गर्भवती केल्याची दु्र्दैवी घटना समोर आली. या प्रकरणी आरोपीवर लैंगिक अत्याचार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना वाशिमच्या कारंजा शहर पोलीस ठाणे परिसरातील आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : नांदेडमध्ये नातेवाईकांचा वाद, भांडण सोडवण्यास गेलेल्या तरुणाला संपवलं; 12 जण अटकेत

19 वर्षीय पीडित तरुणीवर किराना दुकानदाराकडून लैंगिक अत्याचार 

19 वर्षीय पीडित तरुणीने शेजारी राहणाऱ्या किराणा दुकानदारावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. पीडिताने तक्रारीत नमूद केले की, मागील 3 वर्षांपासून शेजारी राहणाऱ्या 45 वर्षीय दुकानदार ब्लॅकमेल करत लैंगिक अत्याचार करत होता, ज्याचा परिणाम महिला गर्भवती राहिली होती. तक्रारीत पीडिताने सांगितलं की, तिची एका तरुणासोबत मैत्री होती आणि ती सतत त्या तरुणासोबत फोनवर बोलायची. 

या घटनेची माहिती पीडितेच्या मामाला समजली असता, त्याने पीडितेला मारहाण केली आणि मोबाइल फोन तोडून टाकला. काही दिवसानंतर तिने किराना दुकानदाराशी बोलण्यासाठी एकाकडे फोनची मागणी केली होती. पीडित महिला ही किराणा दुकानाच्या मालकाच्या फोनवर बोलत होती. एकेदिवशी, 45 वर्षीय प्रफुल्ल साखरकरने त्या तरुणीला सांगितलं की, ती ज्या तरुणाशी बोलत आहे त्याला भेटायचे असेल, तर त्याला किराणा दुकानात बोलावू शकते. पीडित महिला तिच्या तरुणाला चार ते पाच वेळा भेटली. पीडित महिलेनं सांगितलं की, जेव्हा ती आणि तिची मैत्रीण दुकानात बोलत असत, तेव्हा आरोपी मोबाइल फोन घेऊन त्यांचा पाठलाग करत आहे.

पीडितेकडे दुकानदारांनी लज्जास्पद मागणी केली असता, पीडितेनं नकार दिला. काही दिवसानंतर आरोपीने पीडिताला फोनवरून लालच दाखवून दुकानात बोलावण्यात आले आणि पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पीडिता घरी गेली आणि तिने काहीच सांगितलं नाही. काही दिवसानंतर आरोपीने आजीला सांगितलं की, जर काही सामान हवं असल्यास तुम्ही नातीला पाठवा असे सांगितलं. त्यानंतर पीडितेला तिच्या आजीला दुकानदाराकडे पाठवले. पीडिता दुकानदाराकडे गेली असता, दुकानदाराने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. नंतर दुकानदाराने पीडितेला धमकी दिली की जर याबाबत कोणाला काही सांगितल्यास कुटुंबाला फोनवरील रेकॉर्डिंगल शेअर करेन. 

हे ही वाचा : नोकरीच्या नावाखाली करायचा फोन, 78 वर्षीय वृद्धाकडून अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

तरुणी गर्भवती राहिली

नंतर जून महिन्यात पीडितेला मासिक पाळी आली नाही, तिने हे तिच्या आईला सांगितले, तिच्या आईने तिला डॉक्टरकडे नेले, जिथे डॉक्टरांनी तिला दोन ते तीन चाचण्या करण्यास सांगितल्या, परंतु पैशांअभावी त्या चाचण्या झाल्या नाहीत. काही दिवसांनी पीडिता नागपूरला तिच्या मामाकडे गेली, तेथील डॉक्टरांनी तिची तपासणी केली, डॉक्टरांनी सांगितले की ती गर्भवती आहे. पीडिता तिच्या करंजा शहरात परत आली आणि तिच्या आईसोबत पोलीस ठाण्यात पोहोचून तिने तक्रार दाखल केली. करंजा शहर पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी इम्रान पठाण यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीवरून 45 वर्षीय प्रफुल्ल साखरकर याच्या विरोधात बीएनएस आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.