अश्लील व्हिडिओ, डाउनलोड हिस्ट्रीचा तपास; मुलींच्या लैंगिक शोषणाचा पर्दाफाश

मुंबई तक

• 01:32 PM • 30 Oct 2026

crime news : लहान मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित इंटरनेटवर सर्च केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी काही वस्तू जप्त करून आरोपीवर पॉक्सो कायद्यांतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

crime news

crime news

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

लहान मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित इंटरनेटवर केलं सर्च

point

पॉक्सो कायद्यांतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल 

Crime News : उत्तराखंड येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. ऑनलाइन लैंगिक शोषण आणि अश्लील प्रकरणाशी ही घटना जोडली गेलेली आहे. या प्रकरणावर आता एसटीएफने कारवाई करणे सुरू केले आहे. यादरम्यान नैनीताल जिल्ह्यात असाच मन सुन्न करून टाकणारा प्रकार उघडकीस आला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Astrology : आज 30 ऑक्टोबर 2026, 'या' राशींना सावधानतेचा इशारा

लहान मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित इंटरनेटवर केलं सर्च

पोलिसांनी सांगितलं की, आरोपीचा मोबाइल फोन आणि लॅपटॉपमध्ये लहान मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित इंटरनेटवर सर्च करण्यात आले होते. एसटीएफने सांगितलं की, 2026 रोजी राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल पोर्टलवरून मिळालेल्या माहितीनुसार, 2026 मध्ये उत्तराखंडचेच अंदाजे 150 गुन्हे दाखल करण्यात आलेत. 

पॉक्सो कायद्यांतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल 

अहवालानुसार, 25 ऑक्टोबर रोजी नैनिताल जिल्ह्यांत राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलद्वारे 11 तक्रारी आता प्राप्त झालेल्या आहेत. या एकूणच तक्रारीच्या आधारे, हल्दानी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 373/2026 नोंदवण्यात आला. पॉक्सो कायद्यांतर्गत कलम 14/15 आणि माहिती तंत्रज्ञान कलमांन्वये 67 (ब) अंतर्गत करवाई करण्यात आली. 

पोलिसांकडून 'त्या' वस्तू जप्त

तपासातून समोर आले की, पोलिसांनी दोन रियलमी मोबाइल फोन, एक लेनोवो टॅब्लेट, एक एचपी लॅपटॉप आणि एक ओप्पो मोबाईल फोनचा रिकामा बॉक्स जप्त करण्यात आला होता. या उपकरणांच्या सर्च हिस्ट्री, डाउनलोड हिस्ट्री आणि इतर फाइल्समध्ये अश्लील साहित्य आढळले. लॅपटॉपच्या एका ड्राइव्हवर असंख्य अश्लील व्हिडिओ आणि काही फोटो आढळून आले होते. ब्रेव्ह ब्राउझरच्या सर्च हिस्ट्री आणि डाउनलोड हिस्ट्रीत तसेच रिसायकल बिनमध्ये अश्लील व्हिडिओंच्या डिजिटल फाइल्समध्ये आढळून आल्याचे प्रकरण आहे.  

हे ही वाचा : मुंबईत अवकाळी पावसाच्या सरी! नागरिकांची तारांबळ, थंडी कधी येणार?

एसटीएफने सांगितलं की, तपासात बाल लैंगिक शोषणाशी संबंधित साहित्य शोधून डाउनलोड केल्याचे, तसेच अल्पवयीन मुलाचा समावेश असलेल्या लैंगिक कृत्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी संबंधित कायद्यान्वये कायदेशीर कारवाई केल्याची माहिती आहे.