Crime News : ऑनलाइन गेमिंगच्या जगात दडलेल्या धोक्यांची प्रचिती देणारी एक थरारक घटना समोर आली आहे. गुजरातच्या जामनगरमधून एक अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. Free Fire हा लोकप्रिय ऑनलाइन गेम खेळत असताना तिचा संपर्क आसाममधील एका तरुणाशी आला आणि या ओळखीचे रूपांतर एका मोठ्या संकटात झाले. 8 ऑक्टोबर रोजी ही मुलगी एसटी बस स्टँडवरून गूढ रीतीने गायब झाल्यामुळे तिच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. या घटनेने पालकांमध्ये मोठी भीती निर्माण केली असून, सायबर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
ADVERTISEMENT
घरापासून 2000 किमी दूर मुलगी
मुलीचा काहीच पत्ता न लागल्याने पालकांनी तात्काळ जामनगर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे हलवली. जामनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, Technical Surveillance आणि Cyber Cell च्या मदतीने कसून तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणादरम्यान मिळालेल्या लोकेशनवरून ही मुलगी चक्क 2000 किलोमीटर दूर आसाममध्ये असल्याचे उघड झाले, ज्याने पोलीस यंत्रणेलाही थक्क केले.
हे ही वाचा : "आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या अंत्यविधीला जाऊ नये", संजय गायकवाड पुन्हा बरळले
आरोपीला ठोकल्या बेड्या
माहितीची खात्री पटताच जामनगर पोलिसांचे एक पथक थेट असमच्या बोंगाईगांव जिल्ह्यातील जोगीधोपा गावात धडकले. तिथे एका धाडसी कारवाईत पोलिसांनी 24 वर्षीय प्रद्युत चौधरी या मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आणि अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका केली. आरोपीला आणि मुलीला घेऊन पोलीस पथक जामनगरमध्ये परतले, जिथे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. या यशस्वी कारवाईमुळे एका संभाव्य मोठ्या अनर्थापासून मुलीचा जीव वाचला.
हे ही वाचा : विरार : बंद फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे मृतदेह, पोलीस तपासात धक्कादायक सत्य उघड
ऑनलाइन गेमिंगचा धोका
पोलिसांनी आरोपीविरुद्ध Bharatiya Nyaya Sanhita (BNS) आणि POCSO Act अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. ही घटना प्रत्येक पालकासाठी एक धोक्याची घंटा आहे, ज्यातून मुलांच्या ऑनलाइन गेमिंगवर लक्ष ठेवणे किती गरजेचे आहे हे स्पष्ट होते. ऑनलाईन जगतात मिळणाऱ्या कोणत्याही अज्ञानावर सहज विश्वास ठेवू नये आणि वैयक्तिक माहिती शेअर करू नये, असा मोलाचा संदेश या थरारक घटनेतून मिळतो.
ADVERTISEMENT












