मुंबई : नवरा-बायकोमध्ये वाद, नऊ महिन्यांच्या चिमुकल्याला पुलावरुन फेकलं, संपूर्ण परिसर सुन्न

मुंबई तक

28 Oct 2026 (अपडेटेड: 28 Oct 2026, 12:57 PM)

एका वडिलांनी आपल्या नऊ महिन्यांच्या मुलाला घाटकोपर स्कायवॉकवरून खाली फेकून दिल्याची घटना घडली. यामध्ये चिमुकल्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी वडिलांना अटक केली आहे.

Ghatkopar Skywalk Incident

Ghatkopar Skywalk Incident

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

घाटकोपरमध्ये भयंकर घटना

point

नऊ महिन्यांच्या चिमुकल्याला पुलावरुन फेकलं

point

नेमकं काय घडलं?

Ghatkopar Skywalk Incident : घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉकवर रविवारी (25 ऑक्टोबर) एक भयंकर घटना घडली होती. येथे नवरा-बायकोमध्ये झालेल्या वादातून बापाने आपल्या 9 महिन्यांच्या पोटच्या मुलाला थेट स्कायवॉकवरून खाली फेकून दिले होते. या भीषण घटनेत गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला असून, यामुळे कौटुंबिक वादाचे रूपांतर एका मोठ्या शोकांतिकेत झाले आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे.

हे वाचलं का?

स्कायवॉकवर काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 8:15 वाजताच्या सुमारास आरती शेख ही महिला आपल्या नऊ महिन्यांच्या आरव नावाच्या बाळासह घाटकोपर स्थानकाजवळील स्कायवॉकवर उभी होती. त्यादरम्यान तिचा पती जाफर शेख तेथे आला आणि त्यांच्यात कौटुंबिक कारणांवरून कडाक्याचे भांडण सुरू झाले. या वादादरम्यान जाफरने पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, ज्यास आरतीने विरोध दर्शवला.

हे ही वाचा : Maharashtra Rain : 'अर्णब' चक्रीवादळाचा कसा परिणाम होणार? मुसळधार पाऊस कधी?

20 फुटांवरुन...

या विरोधानंतर संतापाच्या भरात जाफरने ताबा गमावला आणि पत्नीच्या हातातील अवघ्या नऊ महिन्यांच्या चिमुकल्याला सुमारे 20 फूट उंच असलेल्या स्कायवॉकच्या रेलिंगवरून थेट खाली फेकून दिले. हा प्रकार पाहून स्कायवॉकखालील व्यावसायिक आणि पादचारी हादरून गेले. खाली पडल्यामुळे बाळाच्या डोक्याला आणि अंतर्गत अवयवांना गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने बाळाला तातडीने शीव (सायन) रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हे ही वाचा : शिंदेंच्या घराकडे निघालेल्या पुर्णेकर कुटुंबाला रोखताच ठाण्यामध्ये राडा

जाफरला ठोकल्या बेड्या

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घाटकोपर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी जाफर शेखला बेड्या ठोकल्या आहेत. आरती शेख यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 109(1), 351(3) आणि 352 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून पुढील तपास करत आहेत.