जालना: 26 वर्षीय तरुणावर कुऱ्हाडीनं हल्ला, लहान भावानं मोठ्या भावाला संपवलं

मुंबई तक

• 06:54 PM • 27 Oct 2026

Jalna Crime News : जालना जिल्ह्यातील घंगुर्डे हदगाव येथे तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला करत खून केल्याची दुर्दैवी घटना समोर आली. विशेष म्हणजे, या हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल होण्यापूर्वी तपासाची चक्रे फिरवले. 

Jalna crime news

Jalna crime news

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

शेतात तरुणाचा आढळला मृतदेह 

point

तुकाराम दारूच्या नशेत आई वडिलांना शिवीगाळ करत मारहाण करायचा

Jalna Crime News : गौरव साळी - जालना जिल्ह्यातील घंगुर्डे हदगाव येथे तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला करत खून केल्याची दुर्दैवी घटना समोर आली. तुकाराम जगन काकडे (वय 26) असी मृत तरुणाची ओळख आहे. सख्खा लहान भाऊ रामेश्वर काकडे (वय 22) याला गोंदी पोलिसांनी ताब्यात घेतलं. विशेष म्हणजे, या हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल होण्यापूर्वी तपासाची चक्रे फिरवले. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : अहिल्यानगर: दहा वर्षांचे प्रेमसंबंध, प्रियकराचा संशय अन् 42 वर्षीय महिलेची हत्या

शेतात तरुणाचा आढळला मृतदेह 

सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तुकाराम काकजे याचा त्याच्या वडिलांच्या शेतात मृतदेह आढळून आला होता. त्याच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार केले होते अशी प्राथमिक माहिती समोर आली. या घटनेचं गांभीर्य ओळखून गोंदी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अमोल गुरले यांच्यासह पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपासाला सुरुवात केली. 

तुकाराम दारूच्या नशेत आई वडिलांना शिवीगाळ करत मारहाण करायचा

पोलिसांनी मृत तरुणाच्या नातेवाईकांची गोपनियरित्या चौकशी केली होती. त्यानंतर कुटुंबात वाद सरू असल्याची माहिती समोर आली होती. तुकाराम हा दारूच्या नशेत आई वडिलांना शिवीगाळ करत मारहाण करायचा असे प्राथमिक चौकशीत नमूद केले होते. याच पार्श्वभूमीवर त्याचा 22 वर्षीय लहान भाऊ रामेश्वर याच्यावर संशय निर्माण झाला. 

हे ही वाचा : क्रूर बापाने नऊ महिन्याच्या बाळाला स्कायवॉकवरून फेकलं, उपचारादरम्यान मृत्यू

प्राथमिक तपासातून समोर आले की, रात्री साडे नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास कुऱ्हाडीने हल्ला करून तुकारामचा खून केल्याच्या प्रकरणात रामेश्वरचा सहभाग निष्पन्न झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला तात्काळपणे ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या प्रकरणी पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई सुरू आहे. या धक्कादायक घटनेनं घुंगर्डे हदगावासह परिसरात एकच खळबळ उडाली.