क्रूर बापाने नऊ महिन्याच्या बाळाला स्कायवॉकवरून फेकलं, उपचारादरम्यान मृत्यू

Mumbai Crime News : मुंबईच्या घाटकोपरमध्ये काही दिवसांपूर्वी मन सुन्न करून टाकणारी घटना घडली. क्रूर बापाने आपल्याच पोटच्या नऊ महिन्याच्या गोळ्याला स्कायवॉकवरून फेकून दिल्याची घटना आहे.

ADVERTISEMENT

Mumbai crime
Mumbai crime
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

नऊ महिन्याच्या बाळाला क्रूर बापाने स्कायवॉकवरून दिलं फेकून 

point

सायन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू 

Mumbai Crime News : मुंबईच्या घाटकोपरमध्ये काही दिवसांपूर्वी मन सुन्न करून टाकणारी घटना घडली. क्रूर बापाने आपल्याच पोटच्या नऊ महिन्याच्या गोळ्याला स्कायवॉकवरून फेकून दिल्याची घटना आहे. त्यानंतर त्या चिमुकल्या मुलाला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा खुनाचा गु्न्हा देखील दाखल केला. हे प्रकरण रविवारी 25 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारे 8.15 वाजता घडली होती. 

हे ही वाचा : Astrology : ग्रहस्थितीमुळे काही राशींच्या करिअर, व्यवसाय आणि आर्थिकबाबत अनुकूल संधी

नऊ महिन्याच्या बाळाला क्रूर बापाने स्कायवॉकवरून दिलं फेकून 

या प्रकरणात आई आरती जाफर शेख हा आपल्या नऊ महिन्याचा मुलगा आरवसोबत रेल्वे स्थानकाच्या स्कायवॉकवर होती. पती जाफर शेख तिथे आला आणि त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. या वादातून जाफरने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. जेव्हा आरतीने आक्षेप नोंदवला असता, तेव्हा संतापलेल्या जाफरने मांडीवर असलेल्या आरवला स्कायवॉकच्या रोलिंगवरून खाली फेकून दिले. 

सायन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू 

मुलाला पाडताना पाहून घटनास्थळावर लोक आले. मुलगा पडल्यानंतर इतरांनी मदतीचा हात दिला होता. पोलिसांच्या मदतीने मुलाला तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलाला गंभीर दुखापत झाल्याची घटना होती, नंतर मुलाची प्रकृती अधिक खालावली गेल्याने त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले, मात्र वाचवता आले नाही. 

हे ही वाचा : लाडकी बहीण योजनेनंतर आता ‘लाडकी विद्यार्थिनी’ योजना! मिळणार 'ऐवढे' पैसे? 

डीसीपी गणेश शिंदे यांनी सांगितलं की, स्कायवॉकवरून फेकल्यानंतर उपचारादरम्यान मुलाला दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांनी सांगितलं की, या प्रकरणात हत्येशी संबंधित कलमे दाखल करण्यात आली. आऱोपी जाफर शेख याला पोलिसांनी अटक केली आहे.