लाडकी बहीण योजनेनंतर आता ‘लाडकी विद्यार्थिनी’ योजना! मिळणार 'ऐवढे' पैसे? 

Kalani Ladki Vidyarthini Yojana : राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर आता उल्हासनगर महापालिकेनं विद्यार्थिनींसाठी विशेष योजना सुरू केली. ज्योती कालानी लाडकी विद्यार्थिनी योजना असं या उपक्रमाचं नाव आहे.

ADVERTISEMENT

Kalani Ladki Vidyarthini Yojana
Kalani Ladki Vidyarthini Yojana
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

महापालिकेनं विद्यार्थिनींसाठी विशेष योजना सुरू केली

point

योजनेतून मिळणार 'ऐवढे' पैसे? 

Kalani Ladki Vidyarthini Yojana : राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर आता उल्हासनगर महापालिकेनं विद्यार्थिनींसाठी विशेष योजना सुरू केली. ज्योती कालानी लाडकी विद्यार्थिनी योजना असं या उपक्रमाचं नाव आहे. इयत्ता सातवी ते बारावीच्या विद्यार्थिनींना वर्षाला 6 हजार रुपये आर्थिक पाठबळ मिळणार आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून ही योजना आखण्यात आली. महापौर अश्विनी निकम यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. 

हे ही वाचा : Astrology : ग्रहस्थितीमुळे काही राशींच्या करिअर, व्यवसाय आणि आर्थिकबाबत अनुकूल संधी

योजनेतून मिळणार 'ऐवढे' पैसे? 

मुलींच्या शिक्षणाला एक मदतीचा हातभार म्हणून आर्थिक अडचणींमुळे शिक्षण थांबू नये हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत सातवी ते बारावीच्या पात्र विद्यार्थिनींना दरवर्षी 6 हजार रुपयांचं आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. ही रक्कम महिन्याला 500 रुपयांच्या समतुल्य आहे. शालेय साहित्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंच्या खर्चासाठी ही आर्थिक मदत उपयोगाची असेल. 

19 हजार विद्यार्थिनींची नोंद

या योजनेसाठी सुमारे 19 हजार विद्यार्थिनींची नोंद झाल्याची माहिती आहे. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेला किती निधी उपलब्ध करून घ्यावा लागणार, याकडे दुर्लक्ष लागलं आहे. माहितीनुसार, योजनेच्या खर्चासंदर्भात सुमारे 9 कोटी 87 हजार रुपयांचा आकडा नमूद करण्यात आला. मात्र आर्थिक आकड्याची अधिकृत अर्थसंकल्पीय कागदपत्रांच्या आधारे खातरजमा होणं आवश्यक आहे. योजनेचे उद्घाटन हे श्रीकांत शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयातून करण्यात आल्याची माहिती आहे. 

या कार्यक्रमाला महायुतीतील भाजपचे नगरसेवक आणि उपमहापौर उपस्थित नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे उल्हासनगरमधील शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय संबंधांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मात्र, संबंधित पदाधिकारी कार्यक्रमाला अनुपस्थित राहण्यामागचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. 

हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यात उन्हाचा चटका कायम, 'या' जिल्ह्यांना अलर्ट नाही

अर्जाचा लाभ कधी मिळेल?  

योजनेच्या घोषणेनंतर आता विद्यार्थ्यांना आणि पालकांना या पात्रतेच्या अटी, शर्थी, प्रक्रिया याकडे लक्ष लागले आहे. महापालिकेकडून यासंदर्भातील अधिकृत नियमावली आणि मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध झाल्यानंतरच लाभार्थ्यांना अर्जाची प्रक्रिया आणि मदत मिळण्याबाबतची स्पष्ट माहिती उपलब्ध होणार आहे. ज्योति कालानी लाडकी विद्यार्थिनी योजना’ हा उल्हासनगर महापालिकेचा महत्त्वाचा उपक्रम ठरू शकतो.