बुलढाणा : 'इकडं ये चॉकलेट देतो', कुरकुरे आणायला गेलेल्या चिमुलीला अमिष अन्...
Buldhana Crime News : बुलढाण्यात चॉकलेटचे आमिष दाखवून आठ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप; 59 वर्षीय दुकानदाराला अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बुलढाणा : 'इकडं ये चॉकलेट देतो',
कुरकुरे आणायला गेलेल्या चिमुलीला अमिष अन्... अत्याचार
Buldhana Crime News, जका खान : बुलढाणा शहरात चॉकलेटचे आमिष दाखवून आठ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 59 वर्षीय दुकानदार शेख मोहम्मद पीर मोहम्मद याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा शहरात राहणारी आठ वर्षीय मुलगी 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास कुरकुरे घेण्यासाठी आरोपीच्या दुकानात गेली होती. यावेळी दुकानदाराने चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून मुलीला दुकानात बोलावल्याचा आरोप आहे. त्यानंतर दुकानात तिच्यासोबत गैरवर्तन करून लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा : Karjat Forest Cutting Ground Report : सह्याद्रीतील कर्जतच्या गावकऱ्याने सांगितली कंपनीची insideस्टोरी
कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी
या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. त्यानंतर मुलीला दुकानातून निघून जाण्यास सांगण्यात आले. घाबरलेल्या मुलीने घरी पोहोचल्यानंतर घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. मुलीकडून संपूर्ण घटना समजल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तातडीने बुलढाणा शहर पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. अल्पवयीन मुलीसोबत घडलेल्या या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तक्रारीच्या आधारे पुढील कारवाई सुरू केली. 24 ऑक्टोबरच्या रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.
हेही वाचा : विधान परिषद निवडणूक निकाल 2026 LIVE : ‘आम्हाला विकत घेऊ शकत नाहीत, जुनी पेन्शन..’ मतपेटीत सापडली चिठ्ठी
आरोपीविरोधात कारवाई करण्याची मागणी करत नागरिकांमध्ये संताप
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 74, 75 आणि 351(2) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण करणाऱ्या पॉक्सो कायद्याच्या कलम 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची नोंद गुन्हा क्रमांक 1065/2026 अशी करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी शेख मोहम्मद पीर मोहम्मद याला अटक केली. आठ वर्षीय मुलीसोबत कथित लैंगिक छळ झाल्याची बातमी परिसरात पसरल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली. या घटनेनंतर आरोपीविरोधात कारवाई करण्याची मागणी करत नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला.
दरम्यान, रविवारी रात्री संतप्त जमावाने आरोपीच्या दुकानावर दगडफेक केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दुकानावर दगडफेक झाल्याची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले आणि जमावाला शांत केले. त्यानंतर परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आली. सध्या परिसरात शांतता असल्याची माहिती आहे. आठ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाच्या आरोपाप्रकरणी पोलिसांनी दुकानदाराला अटक केली असून, या घटनेनंतर परिसरात निर्माण झालेला तणावही पोलिसांनी नियंत्रणात आणला आहे.
