अहिल्यानगर: दहा वर्षांचे प्रेमसंबंध, प्रियकराचा संशय अन् 42 वर्षीय महिलेची हत्या

मुंबई तक

• 06:01 PM • 27 Oct 2026

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगरातील भिंगारजवळील वडारवाडी येथे दहा वर्षांच्या प्रेमसंबंधाचा शेवट हत्येने झाल्याची माहिती समोर आली. दुसऱ्याच एका व्यक्तीशी जवळीक असल्याच्या संशयातून महिलेची हत्या केल्याची माहिती समोर आली, या घटनेनं पूरतं गाव हादरून गेलं आहे.

Ahilyanagar Crime News

Ahilyanagar Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

अनिताचे अन्य व्यक्तीशी प्रेमसंबंध

point

संतोष धोत्रे याला पोलिसांनी घेतले ताब्यात

Ahilyanagar Crime News : रोदित वाळके - अहिल्यानगरातील भिंगारजवळील वडारवाडी येथे दहा वर्षांच्या प्रेमसंबंधाचा शेवट हत्येने झाल्याची माहिती समोर आली. दुसऱ्याच एका व्यक्तीशी जवळीक असल्याच्या संशयातून संतोष धोत्रे (वय 49) याने ग्रामपंचायत कार्यालयात सफाई कर्मचारी अनिता देविदास काळकुटे (वय 42) यांच्यावर चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला केल्याची ही दुर्दैवी घटना आहे. मंगळवारी 27 ऑक्टोबर रोजी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडलेल्या घटनेनं अनिताचा मृत्यू झाला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : क्रूर बापाने नऊ महिन्याच्या बाळाला स्कायवॉकवरून फेकलं, उपचारादरम्यान मृत्यू

अनिताचे अन्य व्यक्तीशी प्रेमसंबंध

अनिता आणि संतोष यांच्यात गेली दहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. अनिताचे अन्य एका व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याचा संतोषला संशय होता. यामुळे दोघांमध्ये सतत वाद निर्माण झाले होते. यात संशयातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली. घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांनीही पाहणी केली.

संतोष धोत्रे याला पोलिसांनी घेतले ताब्यात

दरम्यान, मृतदेह हा शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. अनिता यांचा मुलगा योगेश अळकुटे याची फिर्याद नोंदवण्यात आली होती. संशयित संतोष धोत्रे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हत्येमागील नेमके कारण आणि घटनाक्रमाचा तपास भिंगार कॅम्प पोलीस करत आहेत. 

हे ही वाचा : लातूर: नाल्यात फेकले नवजात बालक, ग्रामस्थांनी वाचवला जीव

या हत्येमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून संतापाची लाट पसरली आहे. प्रेमसंबंधातून झालेला संशय एका महिलेच्या जीवावर बेतल्याची आता चर्चा सुरू झाल्याचे वृत्त आहे. या हत्येमागील कारण पोलीस पुढील तपासातून स्पष्ट करतील. या घटनानंतर गावातील परिस्थिती शांत आहे.