Crime news : एका नवविवाहित महिलेची संशयास्पद परिस्थितीत हत्या करण्यात आली. महिलेनं तिच्या प्रियकराशी विवाह केला होता. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिला घरी बोलावून तिची कथिरित्या हत्या केली होती, नंतर मृतदेह हा स्मशानभूमीत दफन करण्यात आला होता. या घटनेनंतर परिसरात मोठी संतापाची लाट उसळली होती. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील मथुरा येथील आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : क्रूर बापाने नऊ महिन्याच्या बाळाला स्कायवॉकवरून फेकलं, उपचारादरम्यान मृत्यू
तरुणीच्या कुटुंबीयांनी लग्नाचा बनाव रचून मुलीला घरी बोलावले
घडलेल्या घटनेनुसार, मथुरा येथील नया वस्ती येथील रहिवासी असलेली नाझिया सुमारे दीड महिन्यापूर्वी तिचा प्रियकर रवींद्रसोबत स्वेच्छेने घर सोडून गेली होती. त्या दोघांनी लग्न करून दिल्लीत राहण्यास सुरुवात केली होती. असा आरोप केला की, जेव्हा तिच्या कुटुंबीयांनी ही घटना समजली असता, त्यांनी त्यांच्यासाठी विवाह सोहळ्याचे आयोजन केले असा बनाव रचला. तिला मथुरेत बोलावण्यात आले आणि मुलगी देखील मथुरात आली होती.
तरुणी घरी परतल्यानंतर केली हत्या
तरुणी घरी परतल्यानंतर तिच्याच कुटुंबीयांनी तिचा गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह हा नया बस्ती येथे स्मशानभूमीत नेऊन पुरण्यात आला. दरम्यान, नाझियाचा नवरा, रवींद्रने तिच्याशी अनेकदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु काहीतरी गडबड असल्याची भीती अनेक प्रयत्नांनंतरही यश आले नाही. त्यानंतर, त्याने आपल्या पत्नीचे अपहरण आणि खून झाल्याचा आरोप करण्यात आला.
हे ही वाचा : लाडकी बहीण योजनेनंतर आता ‘लाडकी विद्यार्थिनी’ योजना! मिळणार 'ऐवढे' पैसे?
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. नाझियाचा भाऊ अक्रमला ताब्यात घेत त्याची चौकशी करण्यात आली. त्याने या गुन्ह्याचा कबुलीनामा दिला आणि घटनेची संपूर्ण माहिती दिली. या पोलीस प्रकरणाचा संपूर्ण तपास करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT












