हॉटेलच्या खोलीत प्रवेश करताच बँक मॅनेजरची पत्नी कोसळली, 6 सेकंदात मृत्यू

मुंबई तक

• 03:23 PM • 26 Oct 2026

Crime News : विवाहानंतर अवघ्या तीनच महिन्यात बँक कर्मचाऱ्याच्या पत्नीचा हॉटेलच्या खोलीत दुर्दैवी मृत्यू झाला. मृत महिलेच्या वडिलांनी आपल्या जावयावर हत्येचा गंभीर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

खोलीच्या दारात प्रवेश करतात विवाहितेचा मृत्यू 

point

बँक मॅनेजरच्या पत्नीसोबत काय घडलं?

Crime News : उत्तर प्रदेशातील झाशी येथे ऋषभ हॉटेलमध्ये विवाहानंतर तीन महिन्यांत मुस्कान सिमाउलिया (वय 28) हिचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. मृत मुस्कानचे वडील रामजीलाल यांनी तिचा पती, जो एक बँक मॅनेजर म्हणून कार्यरत आहे, निलेशवर हत्येचा आरोप करण्यात आलेला आहे. ही घटना 24 ऑक्टोबर रोजी घडली, जेव्हा मुस्कान तिच्या पतीपासून हॉटेलच्या खोलीत होती. पतीच्या म्हणण्यांनुसार, ती अचानक खाली कोसळली, ज्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी शवविच्छेदन केल्यानंतर आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या प्रकरणाचा पुढील सखोल तपास सुरू करण्यात आला.  

हे वाचलं का?

हे ही वाचा : अरे देवा! मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली, सिग्नल यंत्रणेत बिघाड

खोलीच्या दारात प्रवेश करतात विवाहितेचा मृत्यू 

संबंधित सीसीटीव्ही व्हिडिओ हा 47 सेकंदाचा असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तीन जण हॉटेलच्या गॅलरीतून एका खोलीच्या दिशेने चालताना दिसत आहेत. त्यानंतर दोन पुरुष खोलीत प्रवेश करतात, त्यांच्या पाठोपाठ एक तरुणी येते, जी अचानक खोलीच्या दारात कोसळते. घडलेल्या घटनेनुसार, महिलेला तातडीने रुग्णालयात दखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांना तिला मृत घोषित केले. ही संपूर्ण घटना झाशीच्या सिप्री बाजार पोलीस ठाणे परिसरातील ऋषभ हॉटेलमध्ये घडल्याची माहिती समोर आली. 

निलेशचा यापूर्वी झाला होता विवाह

मृत मुलीचे वडील, रामजी लाल अहिरवार यांनी आपला जावई निलेश याच्यावर हत्येचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. वडिलांच्या माहितीनुसार, त्यांच्या मुलीचा विवाह 29 जून रोजी मध्य प्रदेशातील विदिशा येथे राहणाऱ्या निलेशसोबत झाला होता. विवाहानंतर मुलीने सांगितलं की, निलेशचा यापूर्वी विवाह झाला होता आणि त्याची पहिली बायको इंदूरमध्ये राहत होती. जावई यावरून तिला वारंवार त्रास देत होता आणि टोचून बोलायचा. संबंधित प्रकरणात वडिलांनी आरोप केला की, त्याने मुलीचा चेहरा पकड़ून तिला भीतीवर आदळले, ज्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तिचा मृत्यू झाला. 

हे ही वाचा : मुंबई: क्रूर बापानं नऊ महिन्यांच्या बाळाला स्कायवॉकवरून फेकलं

या चौकशीदरम्यान पतीने सांगितलं की, ते ऋषभ हॉटेलमध्ये खोली क्रमांक 212 येथे राहत होते. सकाळी चेकआऊट करताना त्याची पत्नी अचानकपणे कोसळली. पोलिसांनी हॉटेलची पाहणी केली णि सीसीटीव्ही फुटेज तपासले. सध्या पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत असून वडिलांच्या आरोपांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.