दुहेरी हत्याकांडाने हिंगोलीत खळबळ, पुतण्याने काका-काकूला का संपवलं?

मुंबई तक

26 Oct 2026 (अपडेटेड: 26 Oct 2026, 12:50 PM)

Hingoli waddad double murder case : हिंगोली जिल्ह्यातील वडद येथे सामाईक विहिरीच्या पाण्यावरून आणि शेतीच्या वादातून दुहेरी हत्याकांडाची घटना घडली. या घटनेत त्र्यंबक चोपडे आणि मंगलाबाई चोपडे यांचा मृत्यू झाला असून, संशयित पुतण्या पोलिसांच्या ताब्यात आहे.

Hingoli waddad double murder case

Hingoli waddad double murder case

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

दुहेरी हत्याकांडाने हिंगोलीत खळबळ

point

पुतण्याने काका-काकूला का संपवलं?

Hingoli waddad double murder case : हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील वडद येथे सामाईक विहिरीच्या पाण्यावरून आणि शेतीच्या वादातून दुहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. या घटनेत त्र्यंबक चोपडे आणि मंगलाबाई चोपडे यांचा मृत्यू झाला आहे.

हे वाचलं का?

शेतातील सामाईक विहिरीच्या पाण्यावरून आणि शेतीच्या वादातून पुतण्याने काका आणि काकूवर चाकूने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात त्र्यंबक चोपडे आणि मंगलाबाई चोपडे यांचा मृत्यू झाला. वडद येथे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शेतीच्या वादातून नातेवाईकांमध्ये झालेल्या या हिंसक घटनेने परिसराचे लक्ष वेधले आहे.

हेही वाचा : कोल्हापूर : चुलत्याच्या घरातून सोनं चोरलं, Thar गाडी घेतली; अन् पुजेलाही त्यालाच बोलावलं!

संशयित आरोपी देवेंद्र चोपडे पोलिसांनी ताब्यात

या दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पुढील कार्यवाही सुरू केली. या प्रकरणातील संशयित आरोपी देवेंद्र चोपडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सामाईक विहिरीच्या पाण्यावरून नेमका कसा वाद झाला आणि त्यातून ही घटना कशी घडली, याबाबत अधिक तपशील समोर येणे बाकी आहे.

हेही वाचा : भीमाशंकर वृक्षतोडीवर देवेंद्र फडणवीस रोखठोक, टोरंट प्रकल्पाचं समर्थन करत काय म्हणाले?

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील वडद येथे घडलेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. या घटनेत काका त्र्यंबक चोपडे आणि काकू मंगलाबाई चोपडे यांचा मृत्यू झाला असून, संशयित पुतण्या देवेंद्र चोपडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सामाईक विहिरीच्या पाण्याचा आणि शेतीच्या वादाचा या घटनेशी संबंध असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणातील पुढील तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.