Beed Crime News : रोहिदास हातागळे - बीडच्या पाटोदा येथे आरिफ तकदीर शेख (वय 19) या तरुणाचा अपघात नसून हत्या केल्याने त्याचा मृत्यू झाला. पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत प्रकरणाची सखोल चौकशीसह, गुन्हा दाखल करण्याची तसेच दफन केलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेन करावे अशी मागणी पीडितेच्या आईने केली. पीडितेची आईची रेश्मा शेख अशी ओळख समोर आली. 25 सप्टेंबर रोजी संशयित गणेश गर्जे नावाच्या मुकादन आणि एका साथीदाराने अरिफला मारहाण करून दुचाकीवरून जबरदस्ती बसवून नेले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : गरब्यात तलवार कोयत्यांची दहशत, राजन दुबेला पोलिसांची नोटीस
आरिफच्या अपघाताची माहिती कुटुंबीयांना मिळाली
त्यानंतर 27 सप्टेंबर रोजी आरिफचा अपघात झाल्याची माहिती गर्जे याने कुटुंबीयांना दिली. मात्र, अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत वारंवार अनेकदा चुकीची विधाने केली. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच संशयित घटनास्थळावरून निघून गेल्याने संशय अधिक वाढला असल्याचा कुटुंबीयांचा दावा आहे.
पूर्ववैमनस्य आणि आर्थिक व्यवहाराच्या वादातून हत्येचा संशय
तसेच यापूर्वी त्याच तरुणाला जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. पूर्ववैमनस्य आणि आर्थिक व्यवहाराच्या वादातून ही हत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे. तर शऱीरावरील काही ठिकठिकाणी भागांवर मारहाणीच्या आणि भाजल्याच्या जखमा असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
हे ही वाचा : Astrology : आज कोजागिरी पौर्णिमा, 'या' राशींना होणार लाभ
पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही आणि धमक्या दिल्याचा आरोप देखील कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, पोलिसांची या संदर्भात अद्याप प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
ADVERTISEMENT












