बीडच्या 13 वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून संपवलं जीवन

मुंबई तक

• 03:22 PM • 24 Oct 2026

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगरातील पाथर्डीत एका हॉस्टेलजवळ शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून बीडच्या एका 13 वर्षीय विद्यार्थ्याने जीवन संपवलं. या प्रकरणात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील कवडगावातील आहे.

Ahilyanagar Crime News

Ahilyanagar Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

शिक्षकाविरुद्ध जीवन संपवल्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा 

point

आरोपी शिक्षकावर तात्काळपणे कठोर कारवाईची मागणी

Ahilyanagar Crime News : योगेश काशीद - अहिल्यानगरातील पाथर्डीत एका हॉस्टेलजवळ शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून बीडच्या एका 13 वर्षीय विद्यार्थ्याने जीवन संपवलं. या प्रकरणात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील कवडगावातील आहे. आरोपी शिक्षकाची सुभाष घुले अशी ओळख समोर आली आहे. हे गेली तीन महिन्यांपासून विद्यार्थ्याला विनाकारण मारहाण आणि मानसिक त्रास देत असल्याचा आरोप आहे, यातूनच विद्यार्थ्याने जीवन संपवलं. ही दुर्दैवी घटना 21 ऑक्टोबर रोजी घडल्याची माहिती समोर आली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Astrology : काही राशींना आनंद, तर काही राशींवर चिंतेचे सावट

शिक्षकाविरुद्ध जीवन संपवल्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा 

या प्रकरणातात शिक्षक सुभाष घुगेविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात जीवन संपवल्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मृत मुलाची समर्थ आबासाहेब खरात (वय 13) अशी ओळख समोर आली. तो अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील हिंद वसतिगृहात  राहत होता. समर्थ सातवीत, तर त्याचा भाऊ साई हा इयत्ता पाचवीत शिक्षण घेत होता.

मृत मुलाच्या नातेवाईकांकडून आरोपी शिक्षकावर तात्काळपणे कठोर कारवाईची मागणी

मृत मुलाच्या नातेवाईकांनी आरोपी शिक्षकावर तात्काळपणे कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिकचा तपास केला आहे. दरम्यान, मुलाने जीवन संपवल्यानंतर आता नातेवाईकांनी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडलाय. अखेर विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिलेल्या एकूण फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात शुभाष घुगे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा : लातूर: 11 वर्षीय मुलीचा थंडी- तापाने उपचारादरम्यान मृत्यू, कुटुंबीयांनी डॉक्टरांना धरलं धारेवर

यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि त्यांच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास केला जात असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.