Kalyan Mercedeze Accident : कल्याण पश्चिमेत निक्की नगर परिसरात मॉर्निंक वॉकसाठी बाहेर पडलेल्या सुनील कोळी (वय 25) या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू झाला. भरधाव वेगाने आलेल्या मर्सडिझ कारच्या धडकेत सुनील कोळीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आहे. 21 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला होता. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला होता. आता खडकपाडा पोलिसांनी अपघातात वापरलेली मर्सडिझ कार जप्त करून चालक कोमील अनिल गायकर याला ताब्यात घेतले आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : नवी मुंबई: प्रेयसीसाठी बदललं नाव, दुर्लक्ष केल्यानं प्रियकरानं चाकूने वार करत तरुणीला संपवलं
मर्सडिजच्या भीषण धडकेत सुनील कोळी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
घडलेल्या घटनेनुसार, सुनील कोळी हा नर्सरीत काम करत होता. तो नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडला होता. निक्की नगर परिसरातून जाताना भरधाव मर्सडिजने त्याला जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, सुनील रस्त्याच्या बाजूला असलेल्या कमानीच्या आत जाऊन पडला. या अपघाताचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर जखमी तरुणाला मदत न करता घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोप आहे. या घटनेनं परिसर पूरता हादरून गेला आहे.
कार चालक पोलिसांच्या ताब्यात
या घटनेनंतर खडकपाडा पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा तपास करून अपघातात सहभागी असलेल्या मर्सडिज कारचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी संबंधित कार ताब्यात घेतली असून, कार चालक कोमील अनिल गायकर याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु करण्यात आला.
हे ही वाचा : फुलंब्रीत महिला रुग्णावर कथितरित्या बलात्कार, डॉक्टर आणि BJP शहराध्यक्ष अटकेत
जप्त केलेल्या मर्सडिझ कारच्या पुढील बाजूला महाराष्ट्र विधानसभा सदस्य असा स्टिकर असल्याची माहिती समोर आली. यामुळे स्टिकरबाबत चर्चा सुरु करण्यात आली. हा स्टिकर कोठून मिळवण्यात आला, तो लावण्याची परवानगी होता का आणि त्यामागे नेमका काय उद्देश होता, याची पोलीस चौकशी करत आहेत.
ADVERTISEMENT












