Chhatrapati Sambhajinagar Crime : इसरार - छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलांब्री येथे महिला रुग्णावर कथितरित्या लैंगिक अत्याचाराची दुर्दैवी घटना आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरमी पोलिसांनी मोठी कारवाई केली. पोलिसांनी या प्रकरणात डॉक्टर रामदास महादू तरटे आणि भाजपचे फुलंब्री अध्यक्ष उत्तम भागाजी ढोके याला अटक केली. न्यायालयाने आरोपींना दोन दिवस पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बीड: वधूने लग्नासाठी उकळले अडीच लाख, 48 तासांतच फसवणुकीचे रॅकेट
गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप
पीडित महिलेनं 20 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, महिलेच्या डोकेदुखीच्या उपचारासाठी ती फुलांब्री येथील समर्थ क्लिनिक येथे पोहोचली. संबंधित प्रकरणात आरोप केला की, तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच महिलेचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तिची बदनामी केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
24 तासांत कारवाई करत दोन आरोपी अटकेत
या प्रकरणात गंभीर परिस्थिती पाहून फुलांब्री पोलिसांनी तक्रारीच्या आधारावर भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 24 तासांत कारवाई करत दोन आरोपींना अटक केली.
हे ही वाचा : Astrology : आजच्या दिवशी 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि दोषी आढळलेल्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल.
ADVERTISEMENT












