अल्पवयीन मुलीवर दुकानात लैंगिक अत्याचार, मृत बाळाला दिला जन्म

मुंबई तक

• 04:01 PM • 02 Nov 2026

Crime news : अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेत सातत्याने वाढ होऊ लागली आहे. असाच एक प्रकार गुजरातच्या जामनगरमधून उघडकीस आला आहे. दोन नराध्यांनी एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आणि तिला गर्भवती केले. मुलीने एका बाळाला जन्म देखील दिल्याची घटना आहे.

MumbaiTak
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून दुकानत केला लैंगिक अत्याचार 

point

अल्पवयीन मुलीने मृत बाळाला दिला जन्म

Crime news : अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेत सातत्याने वाढ होऊ लागली आहे. असाच एक प्रकार गुजरातच्या जामनगरमधून उघडकीस आला आहे. दोन नराध्यांनी एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आणि तिला गर्भवती केले. मुलीने एका बाळाला जन्म देखील दिल्याची घटना आहे. या प्रकरणी पोलिसांनी फरार असलेल्या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या घटनेनं परिसर पूरता हादरून गेला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा :  मुंबई: लग्नातील जेवणाने वऱ्हाड्यांना फुड पॉइजनिंग, नवरा बायकोसह 27 जण रुग्णालयात दाखल

अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून दुकानात केला लैंगिक अत्याचार 

घडलेल्या घटनेनुसार, जामनगरच्या जी डिव्हिजन पोलीस ठाणे परिसरातील ही घटना आहे. संबंधित प्रकरणात आरोप केला की, दोन आरोपींनी एका अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून तिला सतत धमकावले आणि एका दुकानात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलगी ही गर्भवती राहिली होती. तिच्या कुटुंबीयांना पीडित मुलगी गरोदर असल्याची माहिती समजली असता, हे प्रकरण समोर आले. 

घडलेल्या घटनेनुसार, हा संपूर्ण प्रकार जामनगरच्या सिटी बी डिव्हिजन पोलीस ठाणे परिसरात घडला. संबंधित प्रकरणात असा आरोप केला की, दोन आरोपींनी एका अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून, तिला धमकावले आणि नंतर एका दुकानात तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला असल्याचे प्रकरण उघडकीस आले. 

कुटुंबीयांनी तक्रारीच्या आधारे, सिटी बी डिव्हिजन पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध एफआरआय नोंदवण्यात आला होता. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. अंतिमक्षणी पोलिसांनी आरोपींचा तपास करत त्यांना अटक केली. 

हे ही वाचा : कुटुंबियांना वाटत होतं मुलगी लंडनमध्ये शिकतेय, पण पुण्यात मृतदेह सापडला!

अल्पवयीन मुलीने मृत बाळाला दिला जन्म

एवढंच नसून पीडित मुलीने एका मृत बाळाला जन्म दिला. अल्पवयीन मुलीचा समावेश असलेली ही घटना आणि बाळाचा मृत्यू यामुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले. घटनेच्या परिस्थितीचा आणि आरोपींनी अल्पवयीन मुलीला आपल्या जाळ्यात कसे ओढले याचा तपास करत आहेत. अशातच आरोपींवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर दोन्ही आरोपींवर कारवाई करण्य़ात आली.