बीड: वधूने लग्नासाठी उकळले अडीच लाख, 48 तासांतच फसवणुकीचे रॅकेट

मुंबई तक

• 12:46 PM • 23 Oct 2026

Beed Crime News : बीडमध्ये एका विवाह रॅकेटचा पर्दाफाश झाल्याची ही दुर्देवी घटना समोर आली आहे. गेवराई येथील एका तरुणाच्या कुटुंबीयांनी लग्नाची व्यवस्था करण्यासाठी जालना येथील जाफराबादमधील मध्यस्थांशी संपर्क साधला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, 22 जून रोजी तरुणाच्या वडिलांनी आपल्या मुलाचा फोटो आणि बायोडाटा व्हॅट्सअॅपद्वारे पाठवला होता. त्यानंतर मध्यस्थांनी एका तरुणीची फोटो पाठवून कुटुंबीयांना जाफराबादला बोलावले होते.

Beed crime news

Beed crime news

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

मुलीला भेटण्यासाठी तरुण आई वडिलांसोबत जाफराबादला 

point

विवाहितेनं तासांतच माहेरी जाण्याचा धरला आग्रह 

Beed Crime News : बीडमध्ये एका विवाह रॅकेटचा पर्दाफाश झाल्याची ही दुर्देवी घटना समोर आली आहे. गेवराई येथील एका तरुणाच्या कुटुंबीयांनी लग्नाची व्यवस्था करण्यासाठी जालना येथील जाफराबादमधील मध्यस्थांशी संपर्क साधला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, 22 जून रोजी तरुणाच्या वडिलांनी आपल्या मुलाचा फोटो आणि बायोडाटा व्हॅट्सअॅपद्वारे पाठवला होता. त्यानंतर मध्यस्थांनी एका तरुणीची फोटो पाठवून कुटुंबीयांना जाफराबादला बोलावले होते.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Astrology : आजच्या दिवशी 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

मुलीला भेटण्यासाठी तरुण आई वडिलांसोबत जाफराबादला 

1 ऑक्टोबर रोजी तो तरुण आपल्या आई वडिलांसोबत मुलीला भेटायला जाफराबादकडे गेला होता. भेटीदरम्यान मध्यस्थांनी संबंध निश्चित करण्यासाठी अडीच लाख रुपयांची मागणी केली होती. लग्नाच्या आशेने कुटुंबाने पैसे देण्यास संमती दिली होती. 

अशातच पोलिसांच्या माहितीनुसार, 5 ऑक्टोबरच्या सायंकाळी वधूचे कुटुंबीय गाडीने गेवराई येथे आले होते. ठरलेल्या रकमेपैकी प्रत्येकी 25 हजार रुपये दोन मोबाईल क्रमांकावर ऑनलाईन पाठवण्यात आले, तर उर्वरित 2 लाख रुपये रोख देण्यात आले होते. त्यानंतर विवाहाचे विधी पार पाडण्यासाठी एका पुजाऱ्याला बोलावण्यात आले होते. लग्नानंतर मध्यस्ती निघून गेले आणि वधूला वराच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले.  

विवाहितेनं तासांतच माहेरी जाण्याचा धरला आग्रह 

अशातच विवाहितेनं एका तासांतच माहेरी जाण्याचा आग्रह धरला, तिच्या कुटुंबीयांनी दसऱ्याच्या सुमारास तिला घरी आणण्याचे वचन दिले. याच काळात महिलेनं उघड केले की, हा विवाह पैसे आणि सोन्याचे दागिने मिळवण्याच्या उद्देशाने रचलेल्या एका रॅकेटचाच एक भाग आहे. नंतर हेच प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले असता, 19 ऑक्टोबर रोजी त्या महिलेचा जबाब नोंदवण्यात आला. तपासातून उघडकीस आले की, तिच्या आधारकार्डवर तिचे वय 20 वर्षे होते, परंतु पोलिसांच्या मते ती मुलगी अल्पवयीन होती. 

हे ही वाचा : Maharashtra El Nino : दुष्काळासह आणखी एक संकट, महाराष्ट्राची चिंता वाढली?

महिलेनं पोलिसांना सांगितलं की, कोणतीही पूर्वकल्पना न देता तिला गेवराई येथे आणण्यात आले होते. जबरदस्ती लग्न करण्यास भाग पाडण्यात आले होते. महिला स्वत:ची फसवणुकीची बळी ठरली की या संपूर्ण योजनेत तिचा वापर करण्यात आला होता, याचा पोलीस तपास करत आहेत.