नावडत्या उमेदवाराला मतदान केल्याने संतापला, मुलानं आईच्या डोक्यात काठी घालून संपवलं, वडिलांवरही हल्ला

पृथ्वीराज पाटील

07 Nov 2026 (अपडेटेड: 07 Nov 2026, 12:25 PM)

निवडणुकीला कुणाला मतदान करायचं यावरुन कुटुंबात वाद झाला. या वादात एका मुलाने आपल्या आईची हत्या केली. राजस्थानातील पंचायत निवडणुकांच्या दरम्यान हा वाद झाला.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

मुलानं केली आईची हत्या

point

मतदान करण्यावरुन वाद

Crime News : राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यात सरपंच निवडणुकीतील वादातून एका मुलाने आपल्याच आईची काठीने मारहाण करून हत्या केल्याची अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पंचायत निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या वादातून हा सगळा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

'त्याला मतदान करु नका'

आरोपी राहुल परमार याचा आपल्या चुलत भावाला मतदान न करण्यावरून वडिलांशी जोरदार वाद झाला. वादादरम्यान संतप्त झालेल्या राहुलने वडील लालचंद यांच्यावर काठीने हल्ला केला. वडिलांना वाचवण्यासाठी गेलेल्या त्याची आई पुष्पा यांच्यावरही राहुलने डोक्यात काठीने वार केला, ज्यामुळे त्या जागीच खाली कोसळल्या. गुरुवारी (6 नोव्हेंबर) रात्री सरपंच निवडणुकीचे निकाल जाहीर झाले होते.

हे ही वाचा : विलीनीकरणाला विरोध, चर्चा फेटाळून लावत रोहित पवार जे म्हणाले ते ऐकाच!

आरोपीलाही दुखापत

आईला वाचवण्यासाठी धावलेल्या मोठ्या भावावरही आरोपीने हल्ला करून त्याला जखमी केले. गंभीर जखमी झालेल्या पुष्पा यांना तातडीने रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला, तर वडील लालचंद यांच्यावर डुंगरपूर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेदरम्यान आरोपी राहुल याच्याही डोक्यात दुखापत झाली असून, पोलिसांनी त्याला अटक करून उपचारासाठी दाखल केले आहे.

हे ही वाचा : 'अट्टहास सोडा' मुश्रीफांवर सतेज पाटील चिडले, थेट रोखठोक भूमिका

निष्पाप आईचा बळी

राजस्थानमधील 27 जिल्ह्यांत पंचायत निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सरपंच आणि वार्ड पंच पदांसाठी मतदान पार पडले होते. लोकशाहीच्या उत्सवातील या राजकीय व कौटुंबिक वादाने एका निष्पाप मातेचा बळी घेतल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.