चर्चगेट विरार फास्ट लोकलमध्ये तुफान हाणामारी, चालत्या लोकलमधून प्रवासी फेकला

सुशांत काळे

• 04:22 PM • 07 Nov 2026

Mumbai Crime News : मुंबई लोकलमध्ये दररोज असंख्य प्रवासी प्रवास करताना दिसतात. या प्रवासादरम्यान लोकलमध्ये मारहाणीच्या घटनेत वाढ होऊ लागली आहे, अशातच मुंबई लोकलमध्ये मारहाणीत एक प्रवासी लोकलमधून फेकल्याची माहिती समोर आली. या घटनेनं एकच खळबळ उडाली. 

Mumbai Crime News

Mumbai Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान एकजण लोकलमधून खाली फेकला 

point

खूनाच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ

Mumbai Crime News : मुंबई लोकलमध्ये दररोज असंख्य प्रवासी प्रवास करताना दिसतात. या प्रवासादरम्यान लोकलमध्ये मारहाणीच्या घटनेत वाढ होऊ लागली आहे. मध्यंतरी आता मुंबई लोकलमध्ये एका व्यक्तीने तरुणावर चाकूने हल्ला करत त्याला भोसकून खून केल्याची दुर्दैवी घटना समोर आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा लोकलमध्ये मारहाणीत एक प्रवासी लोकलमधून फेकल्याची माहिती समोर आली. या घटनेनं एकच खळबळ उडाली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 47 वर्षीय व्यक्तीची मित्राच्या 20 वर्षीय मुलीकडे 'ती' मागणी, तरुणीनं नकार देताच भयंकर घडलं

ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान एकजण लोकलमधून खाली फेकला 

घडलेल्या घटनेनुसार, हा धक्कादायक प्रकार ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान घडला असल्याची माहिती आहे. स्थानकादरम्यान दरवाजात उभे राहण्यावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याच वादाचे मारहाणीत रुपांतर झाले. याच मारहाणीदरम्यान एकजण लोकलमधून खाली फेकला गेल्याची माहिती समोर आली. मुंबई सेंट्रल स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरून रेल्वे जाताना वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला.  

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याची माहिती आहे. मुंबईत अंदाजे जररोज 75 लाखांहून अधिक तर काही वेळा 1 कोटी नागरिक प्रवास करतात, त्यामुळे अशा घटना आता सातत्याने घडू लागलेल्या आहेत. मुंबई लोकलमध्ये अशा घटना घडत असल्याची ही पहिलीच वेळ नाही. खूनाच्या घटनेत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

हे ही वाचा : Astrology : 'या' राशींना नशीबाची लाभणार साथ, जाणून घ्या 12 राशींचे भविष्य

चर्चगेट ते नालासोपारा धावत्या लोकलमध्ये तरुणावर चाकूने वार 

काही महिन्यांपू्र्वी असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.  चर्चगेट ते नालासोपारा या धावत्या लोकलमध्ये मयांक लोहार नावाच्या तरुणावर चाकूने हल्ला करत त्याची हत्या करण्यात आली होती. लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून हा वाद विकोपाला गेला आणि मयांकची हत्या करण्यात आली होती. ज्यात मयांकचा दुर्दैवी मृत्यू झाला.